Argentina Vice President Attack: लोकांशी हस्तांदोलन करताना अचानक बंदुकीतून गोळ्या झाडल्या; अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला

क्रिस्टिना गाडीतून उतरून आपल्या घराच्या आत जात होत्या. त्यावेळी त्या लोकांशी हस्तांदोलन करत होत्या. इतक्यात एक व्यक्ती पिस्तुल घेऊन आला. आणि अचानक त्याने क्रिस्टिना यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या.

Argentina Vice President Attack: लोकांशी हस्तांदोलन करताना अचानक बंदुकीतून गोळ्या झाडल्या; अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला
अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींवर जीवघेणा हल्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 9:39 AM

ब्यूनस आयर्स : अर्जेंटिनाच्या (Argentina) उपराष्ट्रपती क्रिस्टिना फर्नांडिज (Cristina Fernández) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचं वृत्त आहे. उपराष्ट्रपती क्रिस्टिना घराच्याबाहेर लोकांना भेटत होत्या. त्यांच्याशी हस्तांदोलन करत होत्या. तेवढ्यात एका बंदुकधारीने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाल्या. या हल्ल्यात क्रिस्टिना बालंबाल बचावल्या (Vice President Attack) आहेत. मात्र, उपराष्ट्रपतीच्या घराच्या परिसरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या बंदूकधारी व्यक्तिला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

क्रिस्टिना गाडीतून उतरून आपल्या घराच्या आत जात होत्या. त्यावेळी त्या लोकांशी हस्तांदोलन करत होत्या. इतक्यात एक व्यक्ती पिस्तुल घेऊन आला. आणि अचानक त्याने क्रिस्टिना यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. त्याने अत्यंत जवळून क्रिस्टिना यांच्यावर गोळ्या झाडल्या. पण त्यात त्या थोडक्यात बचावल्या. पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून या व्यक्तिच्या मुसक्या आवळल्या. या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

थोडक्यात बचावल्या

या हल्ल्याचं एक फुटेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हल्ला कसा झाला हे स्पष्ट दिसत आहे. क्रिस्टिना या लोकांना हस्तांदोलन करत गर्दीतून निघत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने पिस्तुल रोखल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर त्याने गोळी झाडताच सुरक्षा रक्षकांनी त्याच्या दिशेने धाव घेऊन त्याला ढकलले. त्यामुळे त्याचा निशाणा चुकला आणि क्रिस्टिना थोडक्यात बचावल्या. या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. हल्लेखोर ब्राझिलचा असल्याचं सांगितलं जात आहे.

आरोप फेटाळले

क्रिस्टिना यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे. त्या कोर्टातून घरी आल्या होत्या. त्याचवेळी ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार क्रिस्टिना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. क्रिस्टिना या 2007 ते 2015 दरम्यान अर्जेंटिनाच्या राष्ट्रपती होत्या.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.