शेख हसीना यांना अटक करुन…; बांगलादेशमधून भारताकडे मोठी मागणी

बांगलादेशमध्ये हिंसक आदोलन सुरु झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडल्यानंतर ही लोकांचा राग कमी होताना दिसत नाहीये. बांगलादेशमध्ये अजूनही हिंसा सुरुच आहे, बांग्लादेश सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी भारताकडे मोठी मागणी केली आहे.

शेख हसीना यांना अटक करुन...; बांगलादेशमधून भारताकडे मोठी मागणी
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 5:37 PM

बांगलादेशमधील परिस्थितीने संपूर्ण जग चिंतेत आहे. हिंसक आंदोलनामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील हिंसक आंदोलन पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत घरातून पळ काढला. कारण आंदोलकांनी त्यांच्या घरावर देखील ताबा मिळवला होता. काही मिनिटात त्यांनी देश सोडला. त्या सध्या भारतात असून भारतीय वायु दलाच्या विमानतळावर सुरक्षित आहेत. शेख हसीना यांना आपल्या बहिणीसोबत लंडन जायचे होते. पण आपल्याकडे आश्रय देण्यासाठी कोणताही कायदा नसल्याचं सांगून यूकेने हात वर केले. दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा व्हिसा रद्द केल्याने तिथे जाण्याचा मार्ग ही बंद झाला. त्यामुळे इतर देशातून परवानगी येत नाही. तोपर्यंत त्यांना भारतातच राहावे लागणार आहे.

दुसरीकडे बांगलादेश सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष एम मेहबूब उद्दीन यांनी भारताकडे माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना यांना अटक करून ढाका येथे परत पाठवण्याची मागणी केली आहे. बांगलादेशमधील वृत्तपत्र ‘डेली स्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार एएम मेहबूब उद्दी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्हाला भारतातील लोकांशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. कृपया देशातून पळून गेलेल्या शेख हसीना आणि शेख रेहाना यांना अटक करा आणि त्यांना बांगलादेशला परत पाठवा. शेख हसीना यांनी बांगलादेशात अनेकांची हत्या केली आहे. असा आरोप त्यांनी केला आहे.

बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाच्या विशेष विमानाने बुधवारी सकाळी ढाका येथून 6 लहान मुलांसह 205 लोकांना नवी दिल्लीत परत आणले आहे. मंगळवारी रात्री उशिरा विमानाने बांगलादेशच्या राजधानीसाठी उड्डाण केले. या विमानातून 205 जण भारतात परतले आहेत.

भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षा दलांनी अलर्ट जारी केला आहे. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक दलजीत सिंग चौधरी यांनी बुधवारी त्रिपुरा-बांगलादेश सीमेवरील ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतला. बीएसएफचे महासंचालक दलजीत सिंग बांगलादेश सीमेवरील एकूण सुरक्षा परिस्थितीवर राज्याचे पोलीस महासंचालक अमिताभ रंजन आणि महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) सौमित्र धर यांच्यासोबत बैठक घेणार आहेत.

बांगलादेशच्या नेत्यांनी सांगितले की, नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारच्या सदस्यांच्या नावांवर आज निर्णय घेतला जाईल अशी आशा आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर लष्कराने सर्व सूत्र हाती घेतले आहेत. त्यानंतर देशात अंतरिम सरकार बनवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.