POK बाबत भारत आक्रमक होत असल्याने पाकिस्तानची उडाली झोप, चीनला जाऊन भेटला

पीओकेचा मुद्दा भारतात पुन्हा एकदा तापू लागला आहे. दुसरीकडे पीओकेमध्ये देखील तणावाचे वातावरण आहे. पीओके मधील लोकं पाकिस्तान सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस आणि नागरिकांमध्ये झडप सुरु आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या चिंता वाढू लागल्या आहेत.

POK बाबत भारत आक्रमक होत असल्याने पाकिस्तानची उडाली झोप, चीनला जाऊन भेटला
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 6:53 PM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या तणाव सुरु आहे. दुसरीकडे भाजप सरकारमधील नेत्यांनी त्याच्यावर आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. पीओके आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीत मुद्दा बनला आहे. भारतात पीओके बाबत वक्तव्य होऊ लागल्याने पाकिस्तान सरकार तणावात आले आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार हे चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. चीनकडे त्यांनी काश्मीरबाबत मदतीचे आवाहन केले आहे. आता पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने काश्मीरवर पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं कळतं आहे. चीनने पाकिस्तानला सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेवर पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनीही पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉर किंवा CPEC च्या ‘अपग्रेडेड व्हर्जन’ला प्रोत्साहन देण्यास तयार असल्याचे जाहीर केले. पीओकेमधून जाणाऱ्या सीपीईसीला भारताचा कडाडून विरोध आहे.

इशाक दार म्हणाले की, दोन्ही देशांचा असा विश्वास आहे की काराकोरम महामार्ग चीन आणि पाकिस्तान यांच्यातील भौगोलिक कनेक्टिव्हिटीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा सीपीईसीचा एक महत्त्वाचा भाग आहे.’ हा काराकोरम हायवे PoK मधून जातो ज्याला भारताने विरोध केला होता. पण त्यानंतर ही तो बांधण्यात येतोय. पाकिस्तानचे राष्ट्रीय सार्वभौमत्व, स्वातंत्र्य आणि प्रादेशिक अखंडतेच्या सुरक्षेला चीनचे पूर्ण समर्थन असल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये पाकिस्तानच्या भूमिकेला चीनचा पाठिंबा आहे.

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा भारताच्या पंतप्रधानांपासून, गृहमंत्री ते परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरपर्यंत सर्वांनीच पीओकेबाबत दबाव वाढवला आहे. पीओकेमध्ये बराच हिंसाचार झाला असून तो दडपण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला, ज्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

वांग यी आणि इशाक दार यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या धोरणात्मक संवादात भाग घेतला. ते म्हणाले की चीन आणि पाकिस्तान एकमेकांना पाठिंबा देतील आणि सामरिक सहकार्य भागीदारीसाठी एकत्र काम करतील. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ज्या मुद्द्यांवर एकमत झाले होते त्या मुद्द्यांवर चीन पाकिस्तानसोबत काम करण्यास तयार असल्याचे वांग यी यांनी सांगितले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.