विजय निश्चित होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि युक्रेन युद्धाबाबत दिला इशारा

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा व्हाईट हाऊसचे किंग असणार आहेत. निकाल स्पष्ट झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात जगात सुरू असलेल्या युद्धांबाबतही मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे रशिया आणि इराण काय भूमिका घेतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

विजय निश्चित होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि युक्रेन युद्धाबाबत दिला इशारा
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 4:04 PM

Donald Trump on War : अमेरिकेचे होणारे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी विजय जवळपास निश्चित केला आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे राजकीय पुनरागमन त्यांनी नोंदवले आहे. या निवडणुकीत त्यांनी डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांचा पराभव केलाय. विजय निश्चित होताच फ्लोरिडा येथे भाषणात ट्रम्प म्हणाले की, ‘हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असेल. अमेरिकेने आम्हाला अभूतपूर्व जनादेश दिला आहे.’ यादरम्यान ट्रम्प यांनी जगात सुरु असलेल्या युद्धाबाबत ही मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी इस्रायल आणि युक्रेनमधील युद्धाकडे बोट दाखवत मी युद्ध थांबवणार आहे, मी पुन्हा कोणतेही युद्ध होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या मागील कार्यकाळाची आठवण करून देताना ते म्हणाले की, आम्ही चार वर्षात एकही युद्ध लढले नाही.

मी असतो तर हल्ला झालाच नसता – ट्रम्प

ट्रम्प म्हणाले की, आमचे सैन्य आणखी मजबूत बनवू आणि युद्ध संपवू. माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कोणतेही युद्ध झाले नाही. मी राष्ट्राध्यक्ष असतो तर युद्ध झालेच नसते. इस्रायल-हमास युद्धाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी तिथे असतो तर ७ ऑक्टोबरसारखी परिस्थिती उद्भवलीच नसती. मी तिसरे महायुद्ध होण्यापासून थांबवेल.

ट्रम्प म्हणाले की, ‘तुम्ही ४७वे आणि ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल मला अमेरिकन जनतेचे आभार मानायचे आहेत. जनतेचे अभूतपूर्व आणि शक्तिशाली जनादेश दिला आहे. देवाने माझे प्राण एका कारणासाठी वाचवले आणि ते कारण म्हणजे आपला देश वाचवणे आणि अमेरिकेला पुन्हा मोठे करणे. आपल्याला किमान काही काळ अमेरिकेला प्राधान्य द्यावे लागेल. आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवायला हवे. मी तुम्हाला निराश करणार नाही. आपले भविष्य पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि मजबूत असेल.

ॲलन मस्क यांचे कौतूक

ट्रम्प यांनी इलॉन मस्कचेही कौतुक केले. ट्रम्प यांनी त्यांना ‘सुपर जिनियस’ म्हटले होते. ट्रम्प म्हणाले की मस्कच्या स्टारलिंक उपग्रह सेवेने गेल्या महिन्यात दक्षिण-पूर्व अमेरिकेला धडकलेल्या चक्रीवादळ हेलेन दरम्यान “बरेच जीव वाचवण्यास” मदत केली. मी ॲलनला सांगितले की त्यांना उत्तर कॅरोलिनामध्ये याची खूप गरज आहे. मिळेल का? त्यांच्याकडून लगेच ते मिळाले आणि अनेकांचे प्राण वाचले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.