आक्रितच ! सूर्यग्रहणाला घाबरून ज्योतिष महिलेने नवऱ्यासह मुलांना जीवे मारलं; असं काय घडलं?
अंतराळातील घटना लोकांसाठी नेहमीच कुतुहूल जागवणाऱ्या राहिल्या आहेत. मग तो आपला देश असो की पाश्चात्य देश. या घटनांबाबत अनेकांची उत्सुकता ताणलेली असते. दोन दिवसांपूर्वी सूर्यग्रहण झालं. आयुष्यात एकदा तरी पाहावं असं हे सूर्यग्रहण होतं...
भूगर्भ आणि अंतराळातील घटना लोकांसाठी नेहमीच कुतुहूल जागवणाऱ्या राहिल्या आहेत. मग तो आपला देश असो की पाश्चात्य देश. या घटनांबाबत अनेकांची उत्सुकता ताणलेली असते. दोन दिवसांपूर्वी सूर्यग्रहण झालं. आयुष्यात एकदा तरी पाहावं असं हे सूर्यग्रहण होतं. पण या सूर्यग्रहणामुळे एका कुटुंबाला ग्रहणच लागलं. अमेरिकेत सूर्यग्रहणाच्या काळात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने सूर्यग्रहणाला घाबरून खून केला. तिने आधी नवऱ्याला चाकू भोसकून मारले. इतकेच नाही तर आपल्या निरागस छोकऱ्याचाही जीव घेतला. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही महिला व्यवसायाने ज्योतिषी होती.
सध्या अमेरिकेत या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. पोर्श केयेनमध्ये राहणारी डेनियल जॉनसन ही महिला पेशाने ज्योतिषी आहे. सूर्यग्रहणावर ती रिसर्च करत होती. बुधवारी जेव्हा सूर्यग्रहणामुळे तिने काळी सावली पाहिले, तेव्हा ती शुद्ध हरपून गेली. प्रचंड घाबरलेल्या आणि भांबावलेल्या या महिलेने नवरा डॅनियल जॉनसन याच्या छातीत सुरा खूपसला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
चालत्या कारमधून मुलाला फेकलं
ही हत्या केल्यानंतर या महिलेने तिच्या दोन मुलांना कारमध्ये बसवलं. त्यानंतर या दोन्ही मुलांना चालत्या कारमधून फेकून दिलं. त्यातील एका मुलाचं वय अवघं 8 महिने आहे. तर दुसरा मुलगा नऊ वर्षाचा आहे. मुलांना कारमधून फेकल्यानंतर तिने अत्यंत वेगाने कार चालवत झाडाला धडक दिली. या धडकेत तिचा मृत्यू झाला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट
या घटनेच्या एक दिवस आधी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून तिने सूर्यग्रहणाला युद्धाचं प्रतिक म्हटलं होतं. जग वेगाने बदलत आहे. त्यामुळे स्वत:ला सुरक्षित ठेवा, असा संदेशही तिने दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
4 एप्रिलचं ट्विट काय?
4 एप्रिल रोजीही तिने ट्विट केलं होतं. स्वत:ची काळजी घ्या. तुमचं हृदय स्थिर ठेवा. जग बदलतंय. तुम्हाला कुणाची बाजू घ्यायची असेल तर घ्या. आयुष्यातील अनेक गोष्टींना योग्य वळण लावण्याची अजूनही वेळ आहे, असं तिने म्हटलं होतं.