Sunita Williams : अवकाशातून सुनीता विलियम्स यांच्याबद्दल वाईट बातमी, कुठल्या गंभीर आजाराची लागण?

Sunita Williams : अवकाशात अडकून पडलेल्या सुनीता विलियम्स यांच्याबद्दल एक वाईट बातमी आहे. त्यामुळे नासाच्या अडचणी सुद्धा वाढल्या आहेत. बोइंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टमध्ये बिघाड झाल्याने सुनीता विलियम्स अवकाशात अडकून पडल्या आहेत. नासाचा सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत. दोघेही सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर आहेत.

Sunita Williams : अवकाशातून सुनीता विलियम्स यांच्याबद्दल वाईट बातमी, कुठल्या गंभीर आजाराची लागण?
Astronaut sunita williams
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 3:53 PM

भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात अडकून पडले आहेत. दोघेही आंतरराष्ट्रीय अवकाश स्टेशनवर आहेत. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर कधीपर्यंत परतणार? त्या बद्दल अजूनपर्यंत कुठलीही तारीख समोर आलेली नाही. वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. आता सुनीता विलियम्सच्या प्रकृती संदर्भात नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नॅशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस एडमिनिस्ट्रेशनच्या (NASA) अडचणी वाढल्या आहेत.

सुनीता विलियम्स यांना स्पेस स्टेशनवर डोळ्यांच्या प्रकाशासंदर्भात समस्येचा सामना करावा लागतोय. दीर्घकाळ मायक्रोग्रॅविटीच्या संपर्कात राहिल्यामुळे हा आजार होतो. स्पेसफ्लाइट एसोसिएटेड न्यूरो-ऑकुलर सिंड्रोम म्हणून हा आजार ओळखला जातो. शरीरात फ्लूइड डिस्ट्रीब्यूशन यामुळे प्रभावित होतं. यामुळे डोळ्याच्या प्रकाशावर परिणाम होतो. यामुळे धुरकट दिसू लागतं. विलियम्स यांच्या कॉर्निया, रेटिना आणि लेंसची स्कॅनिंग करण्यात आली. आजार कितपत बळावलाय ते जाणून घेण्यासाठी हे स्कॅनिंग करण्यात आलं.

स्पेसएक्स क्रू ड्रॅगन मिशनचा पर्याय

सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर ISS वर तैनात आहेत. नियोजनानुसार, ते बोइंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टने परतणार होते. पण या यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजून ते अवकाशातच अडकले आहेत. नासा दोघांना पृथ्वीवर आणण्यासाठी अन्य पर्यायांचा विचार करत आहे. यात स्पेसएक्सचं क्रू ड्रॅगनच मिशन आहे.

मग, बोईंगच स्टारलायनर यान तिथेच राहणार का?

क्रू ड्रॅगन मिशनमुळे विलियम्स आणि विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. असं झाल्यास विलियम्स आणि विल्मोर यांना अवकाशात आणखी काही काळ रहावं लागेल. आधी आठ दिवसाने वेळ वाढली. आता आठ महीने लागू शकतात. क्रू ड्रॅगन फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परतणार आहे. त्यामुळे बोईंगच स्टारलायनर रिकामीच पृथ्वीवर परत येईल.

स्पेससूटची काय समस्या?

सुनीता विलियम्स स्पेसएक्सच्या स्पेसक्राफ्टने पृथ्वीवर परतल्या तर तो बोइंगसाठी एक मोठा झटका असेल. कारण सध्या जी परिस्थिती निर्माण झालीय, त्यामुळे बोइंगवर टीका होतेय. नासाने स्पेसएक्सकडे हे मिशन दिलं, तर बोइंगच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. नासासमोर आव्हान स्पेससूटच सुद्धा आहे. बोइंगच्या स्टारलायनरसाठी डिजाइन केलेला सूट स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगनमध्ये उपयोगाचा ठरणार नाही. मिशन स्विच केलं, तर क्रू-9 ड्रॅगनसह अतिरिक्त स्पेससूट पाठवण्यात येईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.