Sunita Williums : असं तर अवकाशात अडकलेल्या सुनीता विलियम्सच्या अडचणी आणखी वाढतील, नासा-बोईंगच भांडण

Sunita Williums : सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर फक्त 8 दिवसांच्या मिशनसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर गेले होते. 13 जूनला दोघे पृथ्वीवर परतणार आहेत. पण स्टारलायनरच्या थ्रस्टरमध्ये बिघाड आणि हीलियम लीकेजमध्ये बिघाड झाल्याने परतीचा प्रवास पुढे ढकलला गेला. तेव्हापासून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अवकाशात अडकून पडले आहेत.

Sunita Williums : असं तर अवकाशात अडकलेल्या सुनीता विलियम्सच्या अडचणी आणखी वाढतील, नासा-बोईंगच भांडण
astronaut sunita williams
Follow us
| Updated on: Aug 09, 2024 | 4:31 PM

अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 5 जूनला बोइंगच्या स्टारलायनर यानाने आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर पोहोचले. पण यानात तांत्रिक बिघाड झाल्याने दोघांच्या पृथ्वीवरील परतीच्या प्रवासाला उशीर होत आहे. बुधवारी रात्री नासाकडून जी माहिती देण्यात आली, त्यानुसार फेब्रुवारी 2025 पर्यंत दोघे पृथ्वीवर परतू शकतात, असा एक अंदाज आहे. विलियम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्याच्या मुद्यावरुन बोईंग आणि नासामध्ये तणाव वाढल्याच्या बातम्या येत आहेत. दोन्ही अवकाशवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्टारलायनर वापरण्यावर सहमती बनली नाही. त्यावरुन नासा आणि बोईंगच्या अधिकाऱ्यांमध्ये तणाव असल्याच द वॉल स्ट्रीट जनरलने वृत्त दिलं होतं.

दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर सुरक्षित परत आणणं हीच नासाची प्राथमिकता आहे. स्टारलायनरमधील बिघाड दुरुस्त होत नसल्याने नासा दुसऱ्या पर्यायांवर सुद्धा विचार करत आहे. बोईंगला अजूनही आपल्या स्टारलायनरवर विश्वास आहे. नासाने मिशन बदलण्याचा निर्णय घेतला, तर स्टारलायनरला चालक दलाशिवाय परत आणण्यासाठी कॉन्फिगर करण्यात येईल असं बोईंगने म्हटलं आहे.

स्पेसएक्स ड्रॅगन वापरण्याचा विचार

स्टारलायनर यानाला अशा पद्धतीने डिजाइन केलय की, विना चालकाशिवाय सुद्धा त्याला पृथ्वीवर आणण शक्य आहे. स्टारलायनरला बाजूला करुन नासाने स्पेसएक्स ड्रॅगनचा वापर केला, तर स्टारलायनर अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परत येईल. नासाने अजूनपर्यंत स्पेस एक्ससोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. क्रू 9 मिशनमध्ये बदल करुन 2 अंतराळवीरांना सुरक्षित परत आणण्याचा विचार करत आहोत, असं नासाने म्हटलय. क्रू 9 मिशन 4 अंतराळवीरांसह ऑगस्टच्या मध्यावर लॉन्च होणार होतं. पण आता हे मिशन 24 सप्टेंबरपर्यंत टाळण्यात आलय.

परत आणण्याचा प्लान काय?

या मिशनसाठी नासा स्पेसएक्सच्या यानाचा वापर करण्याचा विचार करत आहे. नासाचे अधिकारी स्टीव स्टिच यांच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांचा क्रू 9 मिशनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. स्पेसएक्सच यान पृथ्वीवरुन 2 अंतराळवीरांना घेऊन जाईल. परत येताना फेब्रुवारी 2025 मध्ये ISS वर असलेले विलियम्स आणि विल्मोर या दोघांना घेऊन असे चौघे सोबत येतील.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.