Video | युक्रेनकडून रशियन सैनिकांच्या वाहन ताफ्यावर हल्ला; अनेक वाहने उद्ध्वस्त; आग, धुूराचे लोट
आज युक्रेनियन सैनिकांनी रशियाच्या वाहन ताफ्यावर हल्ला केला. रशियन लष्कराच्या ताफ्यावर युक्रेनकडून हल्ला करण्यात आला. T-72 B3 आणि BTR-82A या वाहन ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये अनेक वाहने उद्ध्वस्त झाली आहेत.
युक्रेन (Ukraine) आणि रशियामध्ये (Russia) युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा आज सतरावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर करण्यात येत असलेल्या हल्ल्यामध्ये (Russia Ukraine war) आतापर्यंंत युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्याप्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. संयुक्त राष्ट्राकडून मिळत असलेल्या आकडेवारीनुसार युद्धाच्या भीतीपोटी आतापर्यंत बारा लाख नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. तर दुसरीकडे मात्र काही युक्रेनियन नागरिक देखील युद्धात उतरले असून, रशियाविरोधात लढताना दिसत आहेत. युक्रेनकडून देखील रशियााला चोख प्रत्युत्तर मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. आज युक्रेनियन सैनिकांनी रशियाच्या वाहन ताफ्यावर हल्ला केला. रशियन लष्कराच्या ताफ्यावर युक्रेनकडून हल्ला करण्यात आला. T-72 B3 आणि BTR-82A या वाहन ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये अनेक वाहने उद्ध्वस्त झाली आहेत. या हल्ल्याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
वाहनांचे नुकसान
युक्रेनकडून रशियाच्या T-72 B3 आणि BTR-82A या वाहन ताफ्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये रशियन सैनिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक वाहने उद्ध्वस्त झाली आहेत. वाहनाला आग लागल्याचे आणि घटनास्थळावरून प्रचंड प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याचे या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. दुसरीकडे आज रशियाकडून युक्रेनच्या अन्न साठवणूक केंद्राला तसेच पश्चिमेकडील औद्योगिक केंद्राला लक्ष करण्यात आले आहे.
रशियाची आर्थिक कोंडी
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युद्धबंदीची घोषणा करावी यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव वाढत आहे. अमेरिकेने रशियावर कडक निर्बंध लादले आहेत. सोबतच रशियामधून विविध वस्तुंची आयात देखील थांबवली आहे. अमेरिकेसह जर्मनी, फ्रान्स, कॅनडा सारख्या देशांनी देखील युक्रेनला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता युक्रेनची ताकद वाढल्याचे पहायला मिळत आहे. दुसरीकडे आर्थिक कोंडी झाल्याने याचा रशियाला मोठा फटका बसत आहे.