गाडीवर इसिसचा झेंडा, अमेरिकन सैन्य दलात नोकरी, कोण आहे 15 जणांचा मृत्यूस जबाबदार असणारा शम्सुद्दीन जब्बार?

Who is attacker Shamsud Din Jabbar: जब्बार याने दोन लग्ने केली. परंतु तो दोन्ही पत्नींपासून विभक्त झाला होता. दुसऱ्या लग्नानंतर तो आर्थिक संकटात सापडला होता. त्याच्यावर 27 हजार डॉलर्सचे कर्ज होते.

गाडीवर इसिसचा झेंडा, अमेरिकन सैन्य दलात नोकरी, कोण आहे 15 जणांचा मृत्यूस जबाबदार असणारा शम्सुद्दीन जब्बार?
अमेरिकेतील हल्लेखोर जब्बार
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 8:05 AM

Who is attacker Shamsud Din Jabbar: अमेरिकातील न्यू ऑर्लियंस शहरात नवीन वर्षात दुखद घटना घडली. नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी जमलेला लोकांना शम्सुद्दीन जब्बार या हल्लेखोराने ट्रकने चिरडले. त्यानंतर पोलीस आणि उपस्थित लोकांवरही गोळ्या झाडल्या. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. आतापर्यंत झालेल्या तपासावरुन महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. ४२ वर्षीय अमेरिकी नागरिक शम्सुद्दीन जब्बार याने ज्या ट्रकने लोकांना चिरडले त्यावर इसिसचा झेंडा लावण्यात आला होता.

एक कोटी पगार, अमेरिकन लष्करात नोकरी

एफबीआनुसार, जब्बार याचा जन्म टेक्सासमध्ये झाला. त्याने जॉर्जिया स्टेट विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी केली. तो त्या ठिकाणी डाटा इंजीनियर होता. त्याचा वार्षिक पगार १,२०,००० डॉलर म्हणजे जवळपास एक कोटी होता. त्याने अमेरिकन लष्करात आयटी स्पेशलिस्ट म्हणून जवळपास दहा वर्ष काम केले.

हल्लासाठी ट्रक भाड्याने घेतला

जब्बार याने जो ट्रक गर्दीवर चालवला त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तीन व्यक्ती आणि एक महिला दिसत आहे. ते ट्रकमध्ये आईईडी ठेवताना दिसत आहे. या ट्रकवर इसिसचा झेंडा मिळाल्यामुळे ते इसिसशी संबंधित असू शकतात. जब्बारने हल्ल्यासाठी वापरलेला ट्रक भाड्याने घेतला होता. ट्रकमध्ये एआर स्टाईल रायफल, पिस्तूल आणि काही बॉम्ब सापडले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, जब्बारने संपूर्ण शरीराचे चिलखत घातले होते आणि त्याच्याकडे रायफल होती.

हे सुद्धा वाचा

दोन लग्ने पण दोघांसोबत घटस्फोट

जब्बार याने दोन लग्ने केली. परंतु तो दोन्ही पत्नींपासून विभक्त झाला होता. दुसऱ्या लग्नानंतर तो आर्थिक संकटात सापडला होता. त्याच्यावर 27 हजार डॉलर्सचे कर्ज होते. त्याच्या दुसऱ्या पत्नीचा पती ड्वेन मार्श हिने सांगितले की, जब्बारने गेल्या वर्षीच इस्लाम धर्म स्वीकारण्यास सुरुवात केली. तो त्याबद्दल काहीसा वेडा झाला होता. जब्बारला दोन मुलीही आहेत.

एफबीआय अधिकारी एलेथिया डंकन यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटले की, जब्बार याने हे हत्याकांड एकट्याने घडवले नाही. त्याच्यासोबत अनेक लोक सहभागी आहेत. त्यांच्या शोधासाठी आम्हाला जनतेच्या सहकार्याची गरज आहे. मागील ७२ तासांत शम्सुद्दीन जब्बर याच्याशी कोणी, कोणी संवाद साधला असेल त्यांची सर्वांची चौकशी होणार आहे. तसेच या प्रकरणाची व्हिडिओ, फोटो किंवा इतर काही माहिती असले तर ती नागरिकांनी द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.