नेदरलँडमध्ये इस्रायली लोकांवर हल्ले, नेतन्याहू यांनी तातडीने पाठवले दोन विमानं

ॲमस्टरडॅममध्ये इस्रायलच्या लोकांवर काही लोकांनी हल्ले केले आहे. पॅलेस्टिनी झेंडे घेऊन काही लोकं स्टेडिअमच्या बाहेर होते. इस्रायली लोकांवर ज्यांनी हल्ले केले. पोलिसांनी काही ठिकाणी इस्रायली लोकांना सुरक्षित ठिकाणी नेले. या घटनेनंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी तातडीने पाऊलं उचलली.

नेदरलँडमध्ये इस्रायली लोकांवर हल्ले, नेतन्याहू यांनी तातडीने पाठवले दोन विमानं
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 9:07 PM

नेदरलँड्सची राजधानी ॲमस्टरडॅम येथे गुरुवारी रात्री इस्रायली समर्थकांवर झालेल्या हल्ल्यात अनेक लोकं जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सॉकर सामन्यादरम्यान हे हल्ले सुरू झाले. स्टेडियमच्या बाहेरही इस्रायली लोकांना लक्ष्य करण्यात आले. युरोप लीगचा हा सामना Ajax आणि Maccabi तेल अवीव संघांमध्ये होता. संपूर्ण सामन्यात जोरदार हंगामा पाहायला मिळाला. पोलिसांनी 62 हल्लेखोरांना अटक केली आहे. आता माहिती अशी आहे की, ॲमस्टरडॅममध्ये प्रचंड पोलीस तैनात असूनही, इस्रायली संघाच्या समर्थकांवर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले.

पोलिसांनी अनेक ठिकाणी इस्रायली लोकांची सुटका करुन त्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये नेले. या हल्ल्यांमध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी झाले आहेत. सामन्यापूर्वी स्टेडियमजवळ पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनास महापौरांनी परवानगी नाकारल्यानंतर हे हल्ले झाले. सामन्यादरम्यान पॅलेस्टाईन समर्थकांनी परिसरात मिरवणूक काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र तणाव वाढण्याच्या भीतीने पोलिसांनी लोकांना पुढे जाऊ दिले नाही.

इस्रायल आणि नेदरलँडच्या नेत्यांनी इस्रायली लोकांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने या हल्ल्यांचा निषेध केला आहे. इस्रायली लोकांनी परत आणण्यासाठी इस्रायलने ॲमस्टरडॅमला दोन विमाने पाठवली आहेत, तर नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी इस्रायली समर्थकांवरील हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. ते या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी शूफ यांनी चर्चा केल्याचे सांगितले. नेदरलँडच्या सरकारने एक निवेदन जारी केले आहे की इस्रायल समर्थकांविरुद्ध अशा व्यापक हिंसाचार अस्वीकार्य आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराचा कोणत्याही प्रकारे बचाव करता येणार नाही. धर्मविरोधी वर्तन खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर कारवाई केली जाईल.

पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यू संस्था आणि वस्त्यांभोवती सुरक्षा वाढवली आहे. यासोबतच राजधानीत पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. ॲमस्टरडॅममध्ये ज्यू समुदायाचे लोकं मोठ्या संख्येने राहतात आणि हे शहर दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रसिद्ध ॲन फ्रँक आणि कुटुंबाचे आश्रयस्थान होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.