“सोशल मीडिया हे तर भित्र्यांचं जग, जिथं ते दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करतात”, ट्रोलिंगवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भडकले!

मॉरिसन म्हणाले, 'सोशल मीडिया हे भ्याड लोकांचे ठिकाण बनले आहे, जिथं लोक आपली ओळख उघड केल्याशिवाय जाऊ शकतात, इतरांचे आयुष्य उध्वस्त करू शकतात.

सोशल मीडिया हे तर भित्र्यांचं जग, जिथं ते दुसऱ्यांचं आयुष्य बर्बाद करतात, ट्रोलिंगवर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान भडकले!
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (प्रातिनिधीक फोटो)
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 6:59 PM

Australian PM Scott Morrison Slams Social Media:ऑस्ट्रेलिया सोशल मीडिया कंपन्यांचे (Social Media in Australia) वाईट दिवस सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत, खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोशल मीडिया कंपन्यांना एक कडक इशारा दिला आहे. ते म्हणाले की, ‘जर द्वेषयुक्त कंटेंट पसरवणं थांबवलं नाही, आणि ट्रोलर्सचे नावं उघड केले नाहीत, तर या कंपन्यांवरही तीच कारवाई केली जाईल, जी अशा स्वरुपाचं काम करणाऱ्या प्रकाशकांवर केली जाते,’ मॉरिसन म्हणाले, ‘सोशल मीडिया हे भ्याड लोकांचे ठिकाण बनले आहे, जिथं लोक आपली ओळख उघड केल्याशिवाय जाऊ शकतात, इतरांचे आयुष्य उध्वस्त करू शकतात, इतरांना खूप चुकीच्या आणि आक्षेपार्ह गोष्टी सांगू शकतात आणि त्यासाठी त्यांना शिक्षाही होत नाही.’ ( Australia pm scott morrison slams social media calls it coward palace )

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी ऑनलाईन ट्रोलिंगला लक्ष्य केले आहे. जे आजच्या युगात खूप सामान्य बाब झाली आहे. सोशल मीडिया पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक आक्षेपार्ह कमेंट्सही करत असतात. बऱ्याचदा फेक अकाऊंटवरुन या कमेंट येत असतात, त्यामागचा खरा चेहरा लोकांना माहित नसते. त्यावर बोलताना मॉरिसन म्हणाले की, “ऑनलाईन ट्रोल्स आणि इंटरनेटवर विषारी गोष्टी पसरवणाऱ्या प्रत्येकाने ‘ते कोण आहेत’ हे सांगणे आवश्यक आहे, (Toxic Content on Social Media) कारण ‘मुक्त समाजात, तुम्ही लोकांवर भ्याड हल्ला करू शकत नाही,’ त्यासाठी अशा लोकांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, ‘

नाहीतर सोशल मीडिया कंपन्यांनी कडक कारवाईस तयार राहावं

स्कॉट मॉरिसन पुढे म्हणाले, ‘तुम्हाला माहिती आहे, या कंपन्याबद्दल… जर ते कोण आहेत हे सांगू शकत नसतील, तर त्यांच्याकडे ज्या सोशल मीडिया साईटवर तो कन्टेंट आला आहे, त्या साईटलाच एक प्रकाशक म्हणून पाहिलं जाईल. त्यामुळे त्यांच्यावर त्याच कायद्यानुरुप कारवाई होऊ शकते, जी द्वेष पसरवणाऱ्या एका प्रकाशकावर होते. हेच नाही तर सोशल मीडिया साईट्सवर येणाऱ्या सदोष गोष्टींचा अभ्यास केला जाणार (Australia Social Media Crackdown) असल्याचंही मॉरिसन यांनी आश्वासन दिलं. यावेळी त्यांचा इशारा हा फेसबुककडे होता. कारण, फेसबुकची माजी कर्मचारी आणि व्हिसल ब्लोअर फ्रांन्सिस हॉगेन यांनी फेसबुकबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

फेसबुकवर माजी कर्मचाऱ्याकडूनच गंभीर आरोप

फेसबूकच्या माजी कर्मचारी फ्रान्सिस हॉगेन यांनी फेसबूक लोकांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल असा कन्टेंट पसरवतो असा आरोप केला होता. हेच नाही तर या कर्मचारीने वॉल स्ट्रीट जर्नलला याबाबतचा एक रिपोर्टही दिला होता. जो फेसबूकने केलेला सर्व्हे होता, जो हॉगेन यानी लीक केला. हेच नाही तर हॉगेन यांनी हेही सांगितलं की, चीन आणि इराण शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी फेसबूकचा वापर करतात. ही बाब फेसबुकलाही माहित आहे, मात्र, हेरगिरीरोधी तंत्रज्ञानाच्या अभावाने फेसबुक यावर काहीही करु शकत नाही. दरम्यान, यानंतर काहीच दिवसांपूर्वी फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एक खुलं पत्र लिहून, हे सगळे आरोप फेटाळले होते.

हेही वाचा:

Nobel Prize 2021: मारिया रेसा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना शांततेचं नोबेल जाहीर, स्वतंत्र आणि मुक्त पत्रकारितेवर नोबेलची मोहोर

South China Sea मध्ये चिनी जहाजांची घुसखोरी, मलेशिया भडकला, मलेशियन राजदुताला चीनमधून परत बोलावलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.