पाकिस्तानी सैनिकांच्या काफिल्यावर बलूचींचा हल्ला, मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेल्याची साशंकता

बलूचिस्तानचं प्रशासन स्थानिकांच्या हाती द्यावं आणि जास्तीत जास्त स्वायत्तता दिली जावी अशी मागणी बलूचींची आहे. पण पाकिस्तान सरकारला त्याला कायम वाटाण्याच्या अक्षता दाखवतं. त्यातूनच बलूचिस्ताननं कायम स्वतंत्र होण्याची मागणी केलीय. त्यासाठी ते लढा देतायत

पाकिस्तानी सैनिकांच्या काफिल्यावर बलूचींचा हल्ला, मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेल्याची साशंकता
पाकिस्तानी सैनिक तुकडीवर हल्ला, प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 5:59 PM

Baloch Freedom Fighters Attack on Pakistan Army: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली आणि जसा काय भारताचाच पराभव झालाय अशा थाटात पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाक आर्मी अनेक वल्गना करत सुटलेत. संयुक्त राष्ट्राच्या आम सभेतही इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला. पण त्यांच्या घरात मात्र त्यांना रक्तरंजीत क्रांतीला सामोरं जावं लागतंय. त्याचं कारण आहे बलूचिस्तान लिबरेनश फ्रंट. याच फ्रंटनं आज बलूचिस्तानध्ये पाकिस्तानी लष्कराच्या एका काफिल्यावर हल्ला केला. हा मोठा हल्ला असल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. बलूच स्वातंत्र्य सैनिकांनी रॉकेट आणि IED चा हल्ल्यासाठी वापर केलाय. यात पाकिस्तानी लष्कराचे अनेक सैनिक मारले गेल्याची माहिती आहे.

जी गाडी बलूच स्वातंत्र्य सैनिकांनी उडवून दिली, तिच्या ठिकऱ्या उडाल्यात. म्हणूनच हा शक्तीशाली स्फोट होता हे दिसून येतंय. त्या गाडीवर पाकिस्तानचा झेंडा लावलेला होता. याच घटनेत दोन लोकांचा जीव गेलाय. (Attack on Pakistan army)जे पाकिस्तानी सैनिक मारले गेलेत, त्यात लान्स नायक मोहम्मद मुनीरचा समावेश आहे. विशेष म्हणजे बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF)नं ह्या हल्ल्याची जबाबदारीही घेतलीय. बीएलएफनं दावा केलाय, पाकिस्तानी लष्कराचे 11 जण मारले गेलेत.

का झाला हल्ला? बलूचिस्तानमध्ये पाक लष्कर वेगवेगळे ऑपरेशन्स राबवतं. त्यात ते सामान्य बलूचींचा अतोनात छळ करतात. असच एक ऑपरेशन राबवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराची एक तुकडी अवारान जिल्ह्याच्या पिरांजर भागात आली होती. त्याच वेळेस बलूचींनी हल्ला केला. ह्या हल्ल्याची पुष्टी पाकिस्तान लष्करानं केलेली नाही. पण नेहमी ते करतातच असं नाही. उलट पाक लष्करावर होणारे हल्ले ते दाबण्याचा प्रयत्न करतात. बलूचिस्तान मध्ये तर पाक लष्कराला कायम विरोध होत आलाय. (Baloch Freedom Struggle)

आधीही पाक लष्करावर हल्ला तीन महिन्यापुर्वीही बलूचिस्तानमध्येच पाक लष्करावर मोठा हल्ला झाला होता. त्यात 5 सैनिकांना जीव गमवावा लागला. 27 जण जखमी झाले होते. हल्ला झाला त्यावेळेस पाक लष्करानं त्याची पुष्टी केली नाही. पण नंतर मात्र केली. (Pakistan army attack)हल्लेखोरांनी आधी हल्ला केला, गोळीबार केला आणि नंतर पळून जाण्यात यशस्वी झाले. पाकिस्तानी लष्कर सध्या दुहेरी कचाट्यात सापडलंय. एकीकडे त्यांच्यावर पाकिस्तानी तालिबानी (Pakistan Taliban)हल्ले करतायत तर दुसरीकडे बलूच स्वातंत्र्य सेनानी. चोहोबाजूंनी घर जळत असताना पंतप्रधान इम्रान खान मात्र काश्मीर गिळंकृत करण्याचं स्वप्न बघतायत. तेही तालिबान्यांना सोबत घेऊन.

बलूची कशासाठी लढतायत? पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच बलूचींचा पाकिस्तान सरकारला विरोध आहे. एक तर हा भाग नैसर्गिक साधनसंपत्तीनं समृद्ध आहे. कॉपर, कोळसा, तेल ते सोनेही ह्या भागात सापडतं. पण पाकिस्तानचा सर्वात मागास भाग हाच आहे. बलूचिस्तानला इराण, अफगाणिस्तानचाही शेजार आहे. त्यामुळेच पाकिस्तान सरकार ह्या भागाची लूट करुन इतरत्र वाटतं अशी भावना स्थानिक बलूचींची आहे. त्याला विरोध करण्यासाठी बलूची बंडखोरांनी 1948, 1958-59, 1962-63, 1973-77 ह्या काळात पाकिस्तानी यंत्रणेविरोधात छोटे मोठे लढे दिले. अर्थातच हे लढे सशस्त्र होते. बलूचिस्तानचं प्रशासन स्थानिकांच्या हाती द्यावं आणि जास्तीत जास्त स्वायत्तता दिली जावी अशी मागणी बलूचींची आहे. पण पाकिस्तान सरकारला त्याला कायम वाटाण्याच्या अक्षता दाखवतं. त्यातूनच बलूचिस्ताननं कायम स्वतंत्र होण्याची मागणी केलीय. त्यासाठी ते लढा देतायत. ह्या लढ्यात भारतानं बलूचींच्या बाजूनं नेहमी वजन टाकलेलं आहे.

(Baloch attack on a convoy of Pakistani soldiers, suspected of killing a large number of soldiers )

सोन्याच्या प्रत्येक दागिन्यांना एक युनिक आयडी मिळणार, सरकारची जबरदस्त योजना

‘युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या’, रोहित पवारांचा घरचा आहेर

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.