Bangladesh Court: बांगलादेशाचे पहिले हिंदू चीफ जस्टिस सुरेंद्र कुमार सिन्हा यांना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
ढाका विशेष न्यायदंडाधिकारी, लाँड्रिंग प्रकरणी 7 वर्षांची आणि विश्वासभंगाच्या गुन्हेगारी प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी सुनावण्यात आल्या आहेत. 70 वर्षीय सुरेंद्र कुमार सिन्हा सध्या अमेरिकेत राहतात.
बांगलादेशाच्या न्यायालयाने देशाचे माजी सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा (Surendra Kumar Sinha) यांना मनी लाँड्रिंग आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सुरेंद्र कुमार सिन्हा हे बांगलादेशचे पहिले हिंदू धर्मिय सरन्यायाधीश झाले होते. हिंदू समाज हा बांगलादेशात अल्पसंख्याक मध्ये मोडतो. (Bangladesh court sentences its first Hindu community chief justice 11 years jail for money laundering and corruption)
ढाका विशेष न्यायदंडाधिकारी शेख नजमुल आलम यांनी माजी सरन्यायाधीशांना मनी लाँड्रिंग प्रकरणी 7 वर्षांची आणि विश्वासभंगाच्या गुन्हेगारी प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी सुनावण्यात आल्या आहेत. 70 वर्षीय सुरेंद्र कुमार सिन्हा (न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार सिन्हा) सध्या अमेरिकेत राहतात. त्यांच्या अनुपस्थितीत ही 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली.
काय आहे गुन्हा?
आपल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायमूर्ती सिन्हा हे मनी लाँड्रिंगच्या लाभार्थ्यांमध्ये तितकेच सहभागी आहेत. न्यायमूर्ती सिन्हा यांनी फार्मर्स बँकेकडून, आता पद्मा बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकेकडून 4 लाख 70 हजार अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे 3.50 कोटी रू) कर्ज घेतले. त्यानंतर, पे-ऑर्डरद्वारे ते सिन्हा यांच्या वैयक्तिक खात्यात हस्तांतरित करण्यात आले. जस्टिस सिन्हा यांनी ही रक्कम कॅश, चेक आणि पे ऑर्डरद्वारे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. असे करणे बांगलादेश भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे.
न्यायालयाने मोहम्मद शाहजहान आणि निरंजन चंद्र साहा यांच्यासह दहा जणांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली. त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे. उर्वरित 7 आरोपींना वेगवेगळ्या मुदतीची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला.
4 वर्षांपूर्वी राजीनामा दिला
न्यायमूर्ती सिन्हा हे जानेवारी 2015 ते नोव्हेंबर 2017 या काळात बांगलादेशाचे 21 वे सरन्यायाधीश होते. त्यांच्यावर सरकारकडून भ्रष्टाचाराचा आरोप केला गेला होता. चार वर्षांपूर्वी परदेश दौऱ्यावर असताना न्यायमूर्ती सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बांगलादेशातील सध्याच्या “अलोकशाही” आणि “निरपेक्ष” राजवटीला विरोध केल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. सध्या ते अमेरिकेत राहतात.
Other News