International Politics | इंदिरा-एंजेला मागे पडल्या, पंतप्रधानपद भूषवण्यात ‘या’ महिलेने रचला इतिहास
Sheikh hasina | आपण काही चर्चित महिला नेत्यांशी तुलना केल्यास इंदिरा गांधी यांनी 16 वर्ष, जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी पण 16 वर्ष देशाच नेतृत्व केलं. पण या महिला नेत्यांना शेख हसीना यांनी मागे टाकलं आहे. त्या बांग्लादेशी नेते शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत.
Sheikh hasina | बांग्लादेशात जे ठरलेल तसच घडलं. शेख हसीना यांची पार्टी अवामी लीगने संसदीय निवडणूक जिंकली. फक्त आता विजयाची अधिकृत घोषणा बाकी आहे. पाचव्यांदा शेख हसीना बांग्लादेशच्या पंतप्रधान बनणार आहेत. आजच्या विजयानंतर 2028 पर्यंत बांग्लादेशची कमान शेख हसीना यांच्या हातात राहणार आहे. या विजयासह शेख हसीना यांच्या नावावर एक रेकॉर्डची नोंद झाली आहे. त्या जगातील दीर्घकाळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या महिला नेत्या बनल्या आहेत. आपण काही चर्चित महिला नेत्यांशी तुलना केल्यास इंदिरा गांधी यांनी 16 वर्ष, जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांनी पण 16 वर्ष देशाच नेतृत्व केलं. शेख हसीना यांचा पहिला कार्यकाळ जोडल्यास त्या सलग 20 वर्ष बांग्लादेशच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. पुढची पाचवर्षही त्या याच पदावर राहणार आहेत.
2009 पासून शेख हसीना या पदावर कायम आहे. शेवटच 2018 साली निवडणूक जिंकून त्या बांग्लादेशच्या पंतप्रधान बनल्या होत्या. शेख हसीना बांग्लादेश स्वातंत्र्याच्या लढ्यात आघाडीवर होत्या. मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बंग बंधु शेख मुजीबुर रहमान यांच्या त्या कन्या आहेत. त्या सलग चौथ्यांदा आणि एकूण मिळून पाचव्यांदा बांग्लादेशच्या पंतप्रधान बनणार आहेत.
वडिल बंगाली राष्ट्रवादी नेते
शेख हसीना यांचा जन्म सप्टेंबर 1947 मध्ये पूर्व बंगालच्या टुंगीपारामध्ये झाला. हसीना यांचा जन्म बंगाली मुस्लिम शेख कुटुंबात झाला. आई आणि आजीच्या देखरेखीखाली टुंगीपारामध्ये हसीना यांच बालपण गेलं. त्यानंतर हसीना यांच कुटुंबत ढाक्याला निघून गेलं. ढाकामध्ये सेगुनबागीचा एक जागा आहे, तिथे हसीना यांच कुटुंब वास्तव्याला आलं. हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान बंगाली राष्ट्रवादी नेते होते. त्यांच्या आईच नाव बेगम फाजीलातुनेसा मुजीब होतं.
म्हणून मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आली
1971 ला बांग्लादेशच्या स्वातंत्र्यानंतर शेख हसीना यांची राजकीय समज पक्की झाली. 1975 साली त्यांचे वडिल मुजीबुर रहमान यांची हत्या झाल्यानंतर हसीना यांना काही वर्ष विजनवासात घालवावी लागली. त्यानंतर 1980 साली शेख हसीना बांग्लादेशच्या राजकारणात परतल्या. 1981 साली हसीना वडिलांच्या आवामी लीग पार्टीच्या अध्यक्षा बनल्या. त्यानंतर त्या विरोधी पक्षात होत्या. 1996 साली पहिल्यांदा त्यांना विजय मिळाला. त्या देशाच्या पंतप्रधान बनल्या. हसीना यांच्या पहिल्या कार्यकाळात बांग्लादेशची आर्थिक प्रगती आणि पायाभूत सुविधांचा मोठा विकास झाला. त्यांच्या कार्यकाळात बांग्लादेशात आर्थिक उदारीकरण झालं. त्यामुळे बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आली.