Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bangladesh : बांग्लादेशात वाईट स्थिती, हजारो मजूर रस्त्यावर, मोहम्मद युनूस यांना खूप अपेक्षेनं आणलेलं, पण…

Bangladesh : बांग्लादेशात मागच्यावर्षी सत्तापालट झाला. आरक्षणाविरोधात आंदोलन इतकं तीव्र झालं की, शेख हसीना यांना देशाबाहेर पळावं लागलं. त्यानंतर बांग्लादेशातील स्थिती रुळावर येईल असं वाटलं होतं. पण उलट घडलं. बांग्लादेशात हजारो मजूर रस्त्यावर उतरले आहेत. मोहम्मद युनूस यांच्या राजवटीत बांग्लादेशची वाटचाल अजून अस्थिरतेकडे सुरु आहे.

Bangladesh : बांग्लादेशात वाईट स्थिती, हजारो मजूर रस्त्यावर, मोहम्मद युनूस यांना खूप अपेक्षेनं आणलेलं, पण...
muhammad yunusImage Credit source: TV9 Hindi
Follow us
| Updated on: Mar 24, 2025 | 1:17 PM

मागच्यावर्षी बांग्लादेशात सत्तापालट झाला. शेख हसीना यांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडलं. पण त्यानंतरही बांग्लादेशच्या स्थितीत सुधारणा झालेली नाही. बांग्लादेशच्या राजधानीत शनिवारी हजारो मजूर रस्त्यावर उतरले होते. त्यांनी रस्त्यावर उतरुन विरोध प्रदर्शन केलं. हायवे जाम केला. कारखाने पुन्हा सुरु करण्याची, वार्षिक सुट्टी, वार्षिक सुट्टायांची भरपाई आणि बोनसची मागणी केली. मजुरांनी दोन तास ढाका-मैमनसिंह राजमार्ग रोखून धरला. त्यामुळे ट्रॅफिक जॅम झालं. स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.

रिपोर्ट्नुसार मजुरांच्या विरोध प्रदर्शनामुळे अनेक कारखाने बंद झाले आहेत. विरोध प्रदर्शनादरम्यान अनेक मजुरांचे प्राणही गेले. ते गंभीररित्या जखमी झाले. ढाका संभाग गाजीपूर जिल्ह्यात जायंट निट गारमेंट फॅक्ट्रीच्या मजुरांनी सकाळी फॅक्टरी बंद झाल्याची नोटीस पाहून विरोध प्रदर्शन सुरु केलं. गाजीपुर औद्योगिक पोलीस उपनिरीक्षक (एसआय) फारुक हुसैन यांनी सांगितलं की, श्रमिकांनी सुट्टी आणि बोनसच्या मागणीसाठी गुरुवारी विरोध प्रदर्शन केलं होतं.

कुटुंबासोबत जिवंत राहण्यासाठी संघर्ष

याला उत्तर म्हणून फॅक्टरीच्या अधिकाऱ्यांनी फॅक्टरी बंद केल्याची नोटीस जारी केली असं बांग्लादेशचे प्रमुख दैनिक ‘द ढाका ट्रिब्यून’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. सुट्टी आणि बोनसच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला. पण श्रामिकांच्या समस्येच समाधान झालं नाही. एका आंदोलकाने डेली स्टारला सांगितलं की, “आम्ही आमच्या कुटुंबासोबत जिवंत राहण्यासाठी संघर्ष करतोय. ईद जवळ येत आहे. मात्र, तरीही आमच्या सुट्ट्यांची भरपाई आणि बोनसची कुठलीही गॅरेंटी नाही”

वेतनाला विलंब

मागच्या आठवड्यात शेकडो श्रमिकांनी वेतन न मिळाल्याच्या मुद्यावरुन गाजीपुरच्या भोगरा बायपासवर ढाका-तंगैल आणि ढाका-मैमनसिंह हायवे जाम केला होता. विरोध प्रदर्शनामुळे आधीपासूनच गर्दी असलेल्या भागात ट्रॅफिक जॅम झालं. आंदोलकांचा आरोप होता की, 300 पेक्षा अधिक मजुरांना वेतन मिळालेलं नाही. अधिकारी कुठलही वैध कारण न देता त्यांच्या वेतनाला विलंब लावत आहेत.

हायवे ब्लॉक केलेला

स्थानिक मीडिया रिपोर्ट्नुसार मागच्या आठवड्यात गाजीपूर कलियाकोइरमध्ये कमीत कमी 15 कापड कारखान्याच्या मजुरांनी एक कारखाना बंद झाला आणि श्रमिकांवरील कथित हल्ल्याच्या विरोधात ढाका-तंगैल हायवे ब्लॉक केला होता.

शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा
शिंदेंच्या व्यंगचित्राचे फ्लेक्स लावणं पडलं महागात, त्या बॅनरची चर्चा.
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.