अजान अन् नमाज होताना हिंदू पूजा करु शकणार नाही… पोलीस विना वारंट अटक करणार
Hindus in Bangladesh: नवरात्रापूर्वी देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बैठक घेण्यात आली. यंदा बांगलादेशात 32,666 पूजा मंडप दुर्गात्सवात बनवण्यात येणार आहे. ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, 157 मंडप ढाका साउथ सिटीमध्ये असणार आहे. 88 नॉर्थ सिटी कॉरपोरेशनमध्ये असणार आहेत.
Hindus in Bangladesh: बांगलादेशमध्ये शेख हसीन यांचे सरकार गेल्यानंतर त्या देशातील अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष केले जात आहे. हिंदू मंदिरांची तोडफोड केली गेली आहे. हिंदू प्राध्यापकांचे राजीनामे घेतले गेले आहे. आता मोहम्मद यूनुसच्या नेतृत्वाखालील सरकारने तुघलकी निर्णय घेतला आहे. बांगलादेशात अजान किंवा नमाज होताना हिंदूंना पूजा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. अजानच्या वेळी पूजा पाठ करणाऱ्या हिंदूंना विना वारंट अटक करण्यात येणार आहे. नमाज होत असताना हिंदू समुदायाने भजन ऐकू नये तसेच लाउडस्पीकर लावू नये, असे आदेश युनूस सरकारने काढले आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीकाही सुरु झाली आहे.
अजान होताना लाउडस्पीकर बंद
गृहविभागाचे सल्लागार लेफ्टिनेंट जनरल (सेवानिवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी म्हटले आहे की, पूजा समित्यांना अजान होताना लाउडस्पीकर बंद करण्याचे सांगितले आहे. नमाज दरम्यान या घटना थांबवाव्या लागणार आहेत. जर कोणी या नियमाचे उल्लंघन केले तर त्यांना विना वारंट अटक करण्यात येणार आहे. पूजा समित्यांनी या निर्णयाचे पालन करण्याचे मान्य केले आहे.
नवरात्रापूर्वी देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारकडून बैठक घेण्यात आली. यंदा बांगलादेशात 32,666 पूजा मंडप दुर्गात्सवात बनवण्यात येणार आहे. ढाका ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, 157 मंडप ढाका साउथ सिटीमध्ये असणार आहे. 88 नॉर्थ सिटी कॉरपोरेशनमध्ये असणार आहेत.
हिंदू मंदिरांमध्ये मदरसातील विद्यार्थी
बांगलादेश सरकारने काही दिवसांपूर्वी हिंदू मंदिरांमध्ये मदरसांमधील विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशातील धार्मिक विभागाचे सल्लागार डॉ. एएफएम खालिद हुसैन यांनी राजशाही जिल्ह्यातील गोदागरीत प्रेमतली गौरांग बारी काली मंदिराचा दौरा केला होता.
मोहम्मद यूनुस यांनी काय म्हटले?
दरम्यान, बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी राष्ट्राच्या नावाने संबोधन केले. त्यात म्हटले की, देशातील सद्भाव काय ठेवावे. आम्ही सांप्रदायिक सद्भाव ठेवणारे आहोत. धार्मिक सद्भावना कमी होईल, असे कोणतेही काम कोणी करु नये. जर कोणी कायदा हातात घेऊन सांप्रदायिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.