India-Bangladesh : भारताला डिवचणारं, पटणार नाही बांग्लादेशातील नवीन सरकार करणार तेच काम

India-Bangladesh : 1971 च्या मुक्ती संग्रामानंतर पाकिस्तानच्या पश्चिमी भागापासून वेगळा होऊन बांग्लादेश स्वतंत्र देश बनला. शेख हसीना यांचे पिता शेख मुजीबुर्रहमान या स्वातंत्र्य संग्रामाचे नायक होते. पाकिस्तानी सैन्यावर या क्षेत्रात अत्याचार केल्याचे आरोप आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संघर्षात जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला.

India-Bangladesh : भारताला डिवचणारं, पटणार नाही बांग्लादेशातील नवीन सरकार करणार तेच काम
PM Modi-muhammad yunus
Follow us
| Updated on: Sep 06, 2024 | 10:46 AM

बांग्लादेशच्या नव्या सरकारसोबत अजून भारताचे सूर जुळलेले नाहीत. भारत सरकारने शेख हसीना यांना आश्रय दिला आहे. ही गोष्ट बांग्लादेशच्या नव्या सरकारच्या पचनी पडत नाहीय. शेख हसीना यांचे कट्टर विरोधक बांग्लादेशात बनलेल्या नव्या अंतरिम सरकारमध्ये आहेत. भारत शेख हसीना यांच्या पाठिशी उभा राहिल्याने अंतरिम सरकार भारताच्या विरोधात दिसत आहे. मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखाली हे अंतरिम सरकार भारताच्या चिंता वाढवणारे निर्णय घेत आहे. मोहम्मद यूनुस यांच्या अंतरिम सरकारने आधी हसीना यांच्या कार्यकाळात झालेल्या MoU ची समीक्षा करणार असल्याच म्हटलं. आता बांग्लादेशची पाकिस्तान सोबत जवळीक वाढत चालली आहे.

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारमधील ब्रॉडकास्टिंग आणि IT मंत्री नाहिद इस्लाम यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानसोबत 1971 च्या मुक्ती संग्रामाचे जे मुद्दे आहेत, त्यावर आम्हाला तोडगा काढायचा आहे, असं नाहिद इस्लाम ढाका येथे पाकिस्तानी राजदूतासोबतच्या बैठकीनंतर बोलले. त्याआधी 30 ऑगस्टला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोहम्मद यूनुस यांना फोन केला होता. दोन्ही देशांतील लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र मिळून काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेत भर दिला होता.

बांग्लादेशच नवीन सरकार काय करतय?

महिन्याभरापूर्वी बांग्लादेशसाठी भारत जवळचा मित्र होता. भारतासोबत घनिष्ठ संबंध होते. पण सत्तापालट होताच बांग्लादेश चीन आणि पाकिस्तानच्या जवळ चालला आहे. हसीना सरकारच्या काळात पाकिस्तान आणि बांग्लादेशचे संबंध फार चांगले नव्हते. शेख हसीना सरकारने जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांवर 1971 युद्धावरुन वॉर क्राइमचे (युद्ध गुन्हा) आरोप केले होते.

नाहिद इस्लाम कोण?

नाहिद इस्लाम हे विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. शेख हसीना सरकारविरोधात जे विद्यार्थी आंदोलनाच चेहरा राहिले, त्यात नाहिद इस्लाम आहे. तो आता अंतरिम सरकारमध्ये मंत्री आहे. अंतरिम सरकारमधील वरिष्ठ अधिकारी आणि बांग्लादेशातील पाकिस्तानी उच्चायुक्त सैयद अहमद मारूफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाहिद इस्लामने हे वक्तव्य केलं आहे.

गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.