बांग्लादेश पाठित खंजीर खुपसण्याच्या तयारीत का? PAK मधून आलेल्या जहाजात 250kg RDX, 100 AK47

एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अलीकडच्या एका घटनेमुळे हा संशय बळावला आहे. पाकिस्तानातून एमवी अल बखेरा नावाच एक मालवाहू जहाज निघालं. त्यात 250kg RDX आणि 100 AK47 रायफल्स असल्याची माहिती आहे.

बांग्लादेश पाठित खंजीर खुपसण्याच्या तयारीत का? PAK मधून आलेल्या जहाजात 250kg RDX, 100 AK47
mv al bakhera
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 4:30 PM

बांग्लादेशात सत्तापालट होताच तिथे एकापाठोपाठ एक भारत विरोधी कारवायांनी वेग पकडला आहे. खास बाब म्हणजे कधी काळी बांग्लादेशात नरसंहार करणारा पाकिस्तान आज या देशाचा जवळचा मित्र बनला आहे. दोन्ही देश एकत्र येऊन भारताविरोधात कारस्थान रचत असल्याची माहिती आहे. अलीकडच्या एका घटनेमुळे हा संशय बळावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानातून राजधानी ढाकाला एक जहाज आलं. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात RDX आणि AK47 रायफल्स असल्याची माहिती आहे. हा सर्व साठा बांग्लादेशात पोहोचला आहे.

कराची बंदरातून एमवी अल बखेरा हे पाकिस्तानी मालवाहू जहाज निघालं. त्यात 250 किलो RDX आणि 100 पेक्षा जास्त AK47 रायफल्स होत्या. चांदपूरच्या चटगांव बंदरात हे सर्व सामान पोहोचलय. हे जहाज ढाका बंदरात येणं अपेक्षित होतं, पण ते चांदपूर बंदरावर गेलं. भारताच्या गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, या जहाजावर 720 टन गुराढोरांच खाणं होतं. पण मोठ्या प्रमाणात RDX आणि शस्त्रसाठा चटगांव पोर्टच्या एका सुरक्षित घरात उतरवण्यात आला आहे.

जहाजावर सात जणांची हत्या का केली?

याच दरम्यान बांग्लादेशच्या चांदपूर येथील ईशानबाला कालव्यात उभ्या असलेल्या एमवी अल-बखेरा जहाजात 7 जणांची हत्या झाली. या प्रकरणात आकाश मंडल ऊर्फ इरफानला अटक करण्यात आली आहे. त्याला चांदपूरच्या कोर्टाने 7 दिवसांच रिमांड दिली आहे. रिवर पुलिस इंस्पेक्टर मोहम्मद कलाम खान यांनी 10 दिवसांची रिमांड मागितली होती. पण न्यायिक मजिस्ट्रेट मोहम्मद फरहान सादिक यांनी सात दिवसांची रिमांड मंजूर केली. या खटल्यात सरकारच्या बाजूने 3 वकील होते. पण आरोपीची बाजू मांडणारा एकही वकील नव्हता.

जहाजात पाच मृतदेह सापडले

इरफानला मंगळवारी रात्री चितलमारी भागातून Rab-11 ने अटक केली. इरफानला पगार मिळाला नव्हता, तसच जहाजाचा मालक गोलाम किबिराकडून जी वागणूक मिळायची, त्यावर इरफान नाराज होता. त्याने रागात येऊन जहाजावरील सात जणांची हत्या केली. तटरक्षक दल आणि रिवर पोलिसांना सोमवारी जहाजात पाच मृतदेह सापडले. 3 जखमींना वाचवलं. जखमींपैकी दोघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.