China-Bangladesh : चीनकडून बांग्लादेशचा मोठा भ्रमनिरास, जे ठरवलं, बिलकुल त्या उलट सगळ घडलं
China-Bangladesh : शेख हसीना चार दिवसाच्या चीन दौऱ्यावर होत्या. पण त्या 3 दिवसातच मायदेशी परतल्या. त्यांच्या मुलीची तब्येत बिघडल्याच कारण देण्यात आलं. त्यामुळे अचानक एक दिवस आधीच त्या मायदेशी आल्या. या दौऱ्यात त्यांच्यासोबत काय घडलं? चीनमध्ये त्यांना कशी वागणूक मिळाली? जाणून घ्या.
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना अलीकडेच चीनच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यांच्या या दौऱ्याबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. चीन बांग्लादेशला कर्ज देणार, असं बोलल जात होतं. चीन असं करुन बांग्लादेशला आपल्या बाजूला वळवेल व भारतासमोर नवीन आव्हान निर्माण करेल अशी शक्यता होती. पण या सगळ्या चर्चाच राहिल्या. झाल एकदम या उलट. शेख हसीना चार दिवसाच्या चीन दौऱ्यावर होत्या. पण त्या 3 दिवसातच मायदेशी परतल्या. त्यांच्या मुलीची तब्येत बिघडल्याच कारण देण्यात आलं. त्यामुळे अचानक एक दिवस आधीच त्या मायदेशी आल्या. शी जिनपिंग जास्त महत्त्व देतील, या अपेक्षेने शेख हसीना चीनला गेल्या होत्या. 2016 साली जिनपिंग बांग्लादेश दौऱ्यावर गेले, त्यावेळी त्यांनी अनेक आश्वासन दिलेली.
आम्ही तुम्हाला लाखो कोटींच कर्ज देऊ. आम्ही तुमच्या इथे गुंतवणूक करु, अशी चीनने त्यावेळी आश्वासन दिलेली. त्यावेळी चीनकडे आर्थिक शक्ती होती. पण 8 वर्षानंतर 2024 मध्ये चीनची स्थिती ठीक नाहीय. तेच आर्थिक संकटात आहेत. जिनपिंग यांची तीच आश्वासन लक्षात ठेऊन शेख हसीना चीन दौऱ्यावर गेल्या होत्या. चीन 4 लाख कोटीच कर्ज देईल अशी शेख हसीना यांना अपेक्षा होती. पण चीनकडून जे लोन ऑफर करण्यात आलं, त्याने बांग्लादेश हैराण झाला. चीनने बांग्लादेशला फक्त 900 कोटी लोनची ऑफर दिली. चीनच्या बोलण्यात आणि करण्यात किती फरक आहे, त्याने बांग्लादेश हैराण झाला. असं म्हटलं जातय की, शेख हसीना या ऑफरमुळे नाराज झाल्या व ठरलेल्या वेळेच्या एक दिवस आधीच त्यांनी आपला दौरा गुंडाळला.
चीन दौऱ्यात नाराजीच कारण काय?
बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार, चीनकडून मिळालेली ही ऑफर ढाकाला पसंत नाहीय. कारण बांग्लादेशला जास्तची अपेक्षा होती. शी जिनपिंग यांच्यासोबत दीर्घ चर्चा होईल, अशी शेख हसीना यांना अपेक्षा होती. पण संक्षिप्त चर्चा झाली. त्याशिवाय चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे शेख हसीना यांना भेटले सुद्धा नाहीत. चिनी मीडियाने सुद्धा शेख हसीना यांना जास्त महत्त्व दिलं नाही.
जून महिन्यात दोनवेळा भारतात आल्या
चीनच्या दौऱ्याआधी बांग्लादेशच्या पंतप्रधान भारतात आलेल्या. यावर्षी दोनवेळा त्या भारतात आल्या आहेत. जून महिन्यात दोन्ही दौरे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण समारंभात त्या सहभागी झाल्या. त्यानंतर दोन्ही देशांच्या द्विपक्षीय चर्चेसाठी त्या दिल्लीत आलेल्या. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यानंतर कुठल्या देशाच्या पंतप्रधानाचा हा पहिला दौरा होता.