‘आधी बायकोच्या साड्यांना आग लावा, मग…’ मालदीवनंतर आणखी एका देशात ‘इंडिया आऊट’ अभियान

मालदीवच्या विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी भारत विरोधी अजेंडा राबवून सत्ता मिळवली. आता आणखी एका शेजारच्या देशात भारत विरोध सुरु झाला आहे. तिथे 'इंडिया आऊट' मोहीम सुरु झालीय. त्यावर त्या देशाच्या राष्ट्र प्रमुखांनी "सर्वात आधी आपल्या बायकोची साडी जाळून दाखवावी, मग भारतीय उत्पादनांचा बहिष्कार करावा" असं म्हटलं आहे.

'आधी बायकोच्या साड्यांना आग लावा, मग...' मालदीवनंतर आणखी एका देशात 'इंडिया आऊट' अभियान
Indian Sarees
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 12:30 PM

भारताने नेहमीच शेजारच्या देशांबरोबर चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केलाय. वेळोवेळी या देशांना आर्थिक आणि अन्य प्रकारची मदत केलीय. पण काही देश चीनच्या नादाला लागून भारत विरोध करतात. मालदीवनंतर आता आणखी एका शेजारच्या देशात भारत विरोधी अभियान सुरु आहे. भारताचे शेजारच्या बांग्लादेश बरोबर चांगले संबंध आहेत. बांग्लादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांनी नेहमीच भारताला अनुकूल ठरणारी भूमिका घेतली आहे. आता शेख हसीना यांनी आपल्याच देशाच्या विरोधी पक्षाच्या खासदारांना भरपूर सुनावलं आहे. “जे लोक भारतीय उत्पादनावर बहिष्कार घालण्याबद्दल बोलत आहेत, त्यांनी सर्वात आधी आपल्या बायकोची साडी जाळून दाखवावी” असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे. बांग्लादेशात विरोधी पक्षाचे काही नेते भारतीय उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आधी हे सांगाव की, “त्यांच्या पत्नीकडे किती परेदशी साड्या आहेत. ते त्या साड्यांना का आग लावत नाहीयत?”

शेख हसीना यांनी आपला पक्ष अवामी लीगच्या एका बैठकीला संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षात असलेल्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्यांना टार्गेट केलं. नॅशनलिस्ट पार्टीच्या नेत्यांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी केली होती. हसीना म्हणाल्या, “माझा त्यांना एकच प्रश्न आहे, त्यांच्या पत्नीकडे किती भारतीय साड्या आहेत?. ते आपल्या बायकोच्या साड्यांना आग का लावत नाहीयत? कृपाकरुन बीएनपी नेत्यांनी या बद्दल बोलाव”

भारतीय मसाल्यांबद्दल सुद्धा बोलल्या

यावर्षाच्या सुरुवातीला निवडणुका झाल्यानंतर सलग चौथ्यांदा शेख हसीना यांचं सरकार बांग्लादेशात सत्तेवर आलं. “ज्यावेळी बीएनपी सत्तेवर होती. त्यावेळी त्यांचे मंत्री आणि बायका भारत दौऱ्यात साड्या विकत घेऊन बांग्लादेशात विकायचे” शेख हसीना एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्या भारतीय मसाल्यांबद्दल सुद्धा बोलल्या. “विरोधी पक्षाच्या नेत्याच्या किचनमध्ये भारतीय लसूण, कांदा, आलं, गरम मसाल्याचा वापर होत नाही का?” असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला.

बीएनपी नेता रुहुल कबीर रिजवी यांनी भारतीय उत्पादनांचा प्रतिकात्मक विरोध, बहिष्कार म्हणून काश्मिरी शाल रस्त्यावर फेकली. त्यानंतर शेख हसीना यांनी ही टिप्पणी केली. द डेली स्टारच्या रिपोर्टमध्ये हे म्हटलं आहे.

‘इंडिया-आऊट’ अभियान

बांग्लादेशमध्ये ‘इंडिया-आऊट’ अभियान सुरु आहे. ज्याची सुरुवात काही कुछ एक्टिविस्ट आणि प्रभावशाली लोकांनी केली आहे. विरोधी पक्षात असलेला बीएनपी पक्षाने या अभियानाला समर्थन दिलय. शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष सलग चौथ्यांदा सत्तेवर आला. त्यानंतर या अभियानाने गती पकडली आहे. भारताला शेख हसीना यांनाच सत्तेवर ठेवायच आहे, कारण त्यात त्यांचे व्यापारिक हितसंबंध गुंतले आहेत असं विरोधकांच म्हणण आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.