बांगलादेशात हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले राजीनामे…फक्त दोन शब्द लिहून…

bangladesh protests: बांगलादेशातील निर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनी X वर लिहिले की, 'बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. पत्रकार, मंत्री आणि माजी सरकारी अधिकारी मारले जात आहेत. त्यांना तुरुंगात टाकले जात आहेत. या सर्व प्रकरणात नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद यूनुस शांत आहेत.

बांगलादेशात हिंदू शिक्षकांकडून जबरदस्तीने घेतले राजीनामे...फक्त दोन शब्द लिहून...
प्राचार्य शुक्ला रॉय यांचा राजीनामा लिहून घेतला
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 10:42 AM

बांगलादेशात विद्यार्थ्यांचे सुरु झाले आंदोलन थांबण्यास तयार नाही. या आंदोलनामुळे शेख हसीन यांना बांगलादेश सोडावा लागला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे लक्ष आता अल्पसंख्याक हिंदू ठरत आहे. बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होत आहेत. अत्याचाराचा सामना हिंदूंना करावा लागत आहे. आता बांगलादेशात असणाऱ्या हिंदू शिक्षक आंदोलनाचे केंद्र बिंदू ठरत आहेत. त्यांच्याकडून बळजबरीने राजीनामे लिहून घेतले जात आहे. फक्त दोन शब्द ‘I resign…’, लिहून राजीनामे घेतले गेले आहे. 5 ऑगस्टपासून आतापर्यंत 50 हिंदू शिक्षकांचे राजीनामे घेतल्याचे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे. या शिक्षकांची यादीही दिली गेली आहे.

घरी जाऊन राजीनामे घेतले

बांगलादेशात छात्र एक्य परिषद आहे. या संघटनेत हिंदू, बौद्ध अन् इसाई लोक आहे. त्यानंतर शनिवारी पत्रकार परिषद घेऊन हिंदू शिक्षकांकडून राजीनामे लिहून घेतले जात असल्याचा विषय पुढे आणला. बकरगंज कॉलेजमधील प्राचार्य शुक्ला रॉय यांचा राजीनामा लिहून घेतानाचा फोटो समोर आला आहे. एका साध्या कागदावर “I resign…” इतके लिहून त्यांची सही घेतली गेली आहे. काझी नजरुल विद्यापीठाचे प्रोफेसर संजय कुमार मुखर्जी यांनी राजीनामे घेतले जात असल्याच्या वृत्ताला दुजारा देत सांगितले की, राजीनामा देण्यासाठी माझ्यावर सक्ती करण्यात आली. बांगलादेशात आम्ही खूपच असुरक्षित आहे.

ढाका विद्यापीठातील गणित विभागाचे प्राध्यापक डॉ. चंद्रनाथ पोद्दार यांनाही विद्यार्थ्यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. ज्या शिक्षकांनी भीतीपोटी कॅम्पसमध्ये न येण्याचा निर्णय घेतला होता, त्यांच्या घरी जावून जिहादी गटांनी राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.

हे सुद्धा वाचा

तस्लिमा नसरीन यांनी मांडली परिस्थिती

बांगलादेशातील निर्वासित लेखिका तस्लिमा नसरीन यांनी X वर लिहिले की, ‘बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. पत्रकार, मंत्री आणि माजी सरकारी अधिकारी मारले जात आहेत. त्यांना तुरुंगात टाकले जात आहेत. या सर्व प्रकरणात नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद यूनुस शांत आहेत.

प्राचार्य शुक्ला रॉय यांचा राजीनामा

राजीनामे घेतलेल्या काही शिक्षकांची यादी

  • सोनाली राणी दास – असिस्टंट प्रोफेसर, होली फॅमिली नर्सिंग कॉलेज
  • भुवेशचंद्र रॉय – प्राचार्य, पोलिस लाईन हायस्कूल आणि कॉलेज, ठाकूरगाव
  • सौमित्र शेखर – कुलगुरू, काझी नजरुल इस्लाम विद्यापीठ
  • रतनकुमार मजुमदार – प्राचार्य, पुराण बाजार पदवी महाविद्यालय, चांदपूर
  • मिहिर रंजन हलदर – कुलगुरू, कुवेत
  • आदर्श आदित्य मंडळ – प्राचार्य, कपोतक्ष महाविद्यालय, कोयर, खुलना
  • डॉ. सत्यप्रसाद मजुमदार – कुलगुरू, BUET
  • केका रॉय चौधरी – प्राचार्य, VNC
  • कांचन कुमार बिस्वास – भौतिकशास्त्र शिक्षक, झेनैदह जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाविद्यालय
  • डॉ. दुलाल चंद्र रॉय – संचालक, IQAC, RU
  • डॉ. प्रणवकुमार पांडे – जनसंपर्क प्रशासक, अरबी
  • डॉ.पुरंजित महालदार – सहाय्यक प्रॉक्टर, रबी
  • डॉ. रतन कुमार – सहाय्यक प्रॉक्टर, अरबी
  • डॉ.विजय कुमार देबनाथ – साथिया पायलट मॉडेल स्कूल, पबना
  • गौतम चंद्र पाल – सहाय्यक शिक्षक, अजीमपूर सरकारी कन्या शाळा
  • डॉ. तापसी भट्टाचार्य – प्राचार्य, अन्वर खान मॉडर्न नर्सिंग कॉलेज
  • खुकी बिस्वास – प्रभारी, जेसोर कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मिडवाइफरी
  • डॉ. छयनकुमार रॉय – प्राचार्य, खान साहेब कमरुद्दीन महाविद्यालय (प्रक्रिया)
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.