Bangladesh Violence : भयानक! अवामी लीगच्या 20 नेत्यांची हत्या, 27 जिल्ह्यात हिंदुंवर हल्ले, महत्त्वाच्या अपडेट

Bangladesh Violence : बांग्लादेशात अजूनही परिस्थिती निवळलेली नाही. तिथे रस्त्यावर हिंसाचार सुरु आहे. लवकरच तिथे अंतरिम सरकार स्थापन होईल. शेख हसीना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात निघून आल्या. पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना उपद्रवींच्या संतापाची किंमत मोजावी लागत आहे. आंदोलक हरतऱ्हेने अवामी लीगवर आपला राग काढत आहेत. यात नेत्यांबरोबर त्यांच्या नातेवाईकांचे जीव सुद्धा धोक्यात आहेत.

Bangladesh Violence :  भयानक! अवामी लीगच्या 20 नेत्यांची हत्या, 27 जिल्ह्यात हिंदुंवर हल्ले, महत्त्वाच्या अपडेट
bangladesh protest updates
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 10:55 AM

बांग्लादेशमध्ये अजूनही हिंसाचार सुरु आहे. तिथून चिंता वाढवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. विद्यार्थ्यांच्या विरोधातून उभ्या राहिलेल्या आंदोलनामध्ये आज देश जळत आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही हिंसाचार सुरु आहे. एक धक्कादायक घटना घडली आहे. शेख हसीन यांच्या अवामी लीग पार्टीच्या 20 नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना भारतात आश्रयाला आल्या आहेत. त्यांच्या पक्षाच्या अवामी लीगच्या नेत्यांना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अवामी लीगच्या 20 नेत्यांचे मृतदेह मिळाले आहेत. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची सुद्धा हत्या करण्यात आली आहे. पार्टीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरात आणि दुकानांमध्ये तोडफोड, जाळपोळ सुरु आहे.

बांग्लादेशच्या सतखिरा येथे झालेल्या हिंसाचारात 10 लोकांचा मृत्यू झाला. कुमिलामध्ये 11 लोकांना ठार मारण्यात आलं. बांग्लादेशचे माजी काउन्सिलर मोहम्मद शाह आलम यांच्या तीन मजली घराला दंगलखोरांनी आग लावली. यात सहाजणांचा मृत्यू झाला. बांग्लादेशातील प्रसिद्ध गायक राहुल आनंद यांचं ढाका धानमंडी येथील 140 वर्ष जुन घरं समाजकंटकांनी जाळलं. आनंदच हे घर जिवंत सांस्कृतिक केंद्र होतं. दंगलखोरांनी हे घर जाळण्याआधी तिथे लुटमार केली.

भारतात येण्यासाठी निघालेल्या मंत्र्याला विमानतळावरच अटक

शेख हसीना देश सोडून पळाल्या. आता त्यांच्या पक्षाचे नेते, मंत्री यांना लक्ष्य करण्यात येतय. बांग्लादेशचे माजी परराष्ट्र मंत्री हसन महमूद यांना ढाका एयरपोर्टवरुन ताब्यात घेण्यात आलं. ते भारतात येण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी अटक झाली. बांग्लादेशात सत्तापालट होण्याआधी शेख हसीना यांच्या अवामी लीग पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री देशाबाहेर पळाले होते. अवामी लीगचे सरचिटणीस आणि रस्ते परिवहन मंत्री अब्दुल क्वादर रविवारी रात्रीच देशाबाहेर निघून गेले. हसीना सरकारमध्ये मंत्री राहिलेले अनिसुल हक देशसोडून अज्ज्ञात स्थळी रवाना झाले आहेत.

पोलिसांचा संप

सत्तापालटानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. देशाच्या 27 जिल्ह्यात हिंदुंवर हल्ले झाले आहेत. उपद्रवी मंदिरांना सुद्धा लक्ष्य करत आहेत. बांग्लादेश पोलिस सर्विस असोसिएशनने (BPSA) मंगळवारी संपाची घोषणा केली. जो पर्यंत पोलिसांची सुरक्षा निश्चित होत नाही, तो पर्यंत आम्ही संपावर आहोत. सोमवारी बांग्लादेशात 400 पेक्षा अधिक पोलीस स्टेशन्सवर हल्ला झाला. यावेळी अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?
युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?.
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले..
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले...
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू.
बावनकुळेंसाठी कायदा वेगळा? नागपुरातील अपघातावरून अंधारेंचा हल्लाबोल
बावनकुळेंसाठी कायदा वेगळा? नागपुरातील अपघातावरून अंधारेंचा हल्लाबोल.
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादा का नव्हते? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात दादा का नव्हते? अमोल मिटकरींनी दिलं उत्तर.
Amazon : 'ॲमेझॉन'वरून काही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा!
Amazon : 'ॲमेझॉन'वरून काही ऑर्डर करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पहा!.
बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्... एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना
बाळाला ट्रेनच्या शौचालयात टाकले अन्... एक्सप्रेसमधील धक्कादायक घटना.
कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?
कृषिमंत्री धनंजय मुंडे कादर खानचा रोल करतात, कोणी केली टीका?.
'राऊतांची औकात नाही, मानहानीचा दावा करणार'; कोणी केला हल्लाबोल?
'राऊतांची औकात नाही, मानहानीचा दावा करणार'; कोणी केला हल्लाबोल?.
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद
अमित शाहांनी आपल्या पत्नीसह घेतले लालबागच्या राज्याचे आशीर्वाद.