Bangladesh Violence : भारताकडून बांग्लादेश कुठलं सामान मागवतो? व्यापारावर काय परिणाम होणार?

Bangladesh-India Trade : शेजारच्या बांग्लादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे. मात्र बांग्लादेश भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. अब्जावधी डॉलर्सचा दोन्ही देशांमध्ये आयात-निर्यातीचा व्यापार आहे. या सगळ्या व्यापाराला किती फटका बसणार आहे, जाणून घ्या.

Bangladesh Violence : भारताकडून बांग्लादेश कुठलं सामान मागवतो? व्यापारावर काय परिणाम होणार?
Bangladesh Violence
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 5:17 PM

बांग्लादेशात भयानक स्थिती आहे. बांग्लादेश हिंसाचारात होरपळत आहे. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाल्या आहेत. या हिंसाचारामुळे तिथे सत्तापालट झालाय. हिंसक विरोध प्रदर्शनात 100 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. मोठ्या संख्येने आंदोलक ढाका पॅलेसमध्ये घुसले आहेत. मुजीब यांच्या मुर्तीची तोडफोड केलीय. देशात तणाव असताना आर्मी चीफ वकार-उज-जमान अंतरिम सरकार स्थापन करणार आहेत. हिंसाग्रस्त बांग्लादेश सोबत भारताचे व्यापारिक संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये आयात-निर्यातीचा व्यापार चालतो. भारतात बांग्लादेशातून काय येतं? आणि भारतातून काय पाठवलं जातं? जाणून घ्या.

बांग्लादेशात सुरु असलेल्या या हिंसाचाराचा परिणाम भारतासोबतच्या व्यापारावरही झालाय. एका रिपोर्टनुसार, दररोज 150 कोटी रुपयापेक्षा जास्तचा बिझनेस प्रभावित झाला. पेट्रापोल आणि बेनेपोल सीमेवपरुन दोन्ही देशांमध्ये वर्षाला 30 हजार कोटींचा व्यापार होतो. मागच्या काही दिवसांपासून हा व्यापार ठप्प आहे.

किती अब्ज डॉलरचा व्यापार

ibef.org आकड्यांनुसार, Bangladesh भारताचा एक मोठा ट्रेडिंग पार्टनर आहे. वित्त वर्ष 2023-24 मध्ये दोन्ही देशांमध्ये एकूण 14.22 अब्ज डॉलरचा व्यापार झाला. FY23 मध्ये भारतातून बांग्लादेशला 6,052 वस्तूंची निर्यात झाली. निर्यातीचा हा आकडा 12.20 अब्ज डॉलर होता. FY22 मध्ये झालेल्या 16.15 अब्ज डॉलरपेक्षा हा आकडा कमी आहे.

भारतातून बांग्लादेशला पाठवल्या जाणाऱ्या प्रमुख वस्तू (वित्त वर्ष 2023)

कापूस धागा (1.02 अब्ज डॉलर)

पेट्रोलियम उत्पादने (816 मिलियन डॉलर)

धान्य (556 मिलियन डॉलर)

सूती कपडे आणि अन्य सामना (541 मिलियन अमेरिकी डॉलर)

कार्बनिक आणि अकार्बनिक रसायन (430 मिलियन डॉलर)

बांग्लादेशातून भारतात वित्त वर्ष 2023-24 मध्ये 1154 वस्तुंची आयात करण्यात आली. हा व्यापार जवळपास 2.02 अब्ज डॉलरचा होता. मागच्या FY22 मध्ये हा आकडा 1.97 अब्ज डॉलरचा होता.

बांग्लादेशातून भारतात येणाऱ्या प्रमुख वस्तू (वित्त वर्ष 2023)

RMG कापूस (510 मिलियन डॉलर)

सूती कपड़े, मेड-अप (153 मिलियन डॉलर)

RMG मानव निर्मित फायबर (142 मिलियन डॉलर)

मसाले (125 मिलियन डॉलर)

जूट (103 मिलियन डॉलर)

भारत आणि बांग्लादेशमध्ये व्यापारी संबंध मजबूत झालेत. भारत आणि बांग्लादेशने व्यापाराच्या बाबतीत भारतीय रुपयात व्यवहार करण्याच महत्त्वाच पाऊल उचललं आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.