प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी अमेरिका ही झाली राममय, मंदिरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन
Ram Mandir Update : भगवान राम ५०० वर्षानंतर आपल्या जन्मस्थानी पुन्हा एकदा विराजमान होत आहेत. ५०० वर्षानंतर अयोध्येत रामाचे मंदिर होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच नाही तर विदेशातही आनंदाचे वातावरण आहे. अमेरिकेत या निमित्ताने २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Ram mandir : 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी जगातील सर्वच देशांमध्ये मोठी तयारी करण्यात आली आहे. अमेरिकाही राममय झाली आहे. अमेरिकेतील शेकडो मंदिरांमध्ये या निमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरांमध्ये पूजा, भजन-कीर्तनापासून भंडार्यापर्यंत आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येतील राम मंदिर ५०० वर्षानंतर तयार झाले आहे. त्यामुळे अमेरिकेतील सर्व हिंदू मंदिरांमध्ये ही जय्यत तयारी केली गेली आहे.
अमेरिकेतील मंदिरांमध्ये सजावट
अमेरिकेतील मंदिरांमध्ये होत असलेल्या या कार्यक्रमासाठी हजारो भारतीय अमेरिकन सहभागी होण्याची अपेक्षा आहे. अमेरिकेच्या हिंदू विद्यापीठाचे अध्यक्ष कल्याण विश्वनाथन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अयोध्या सनातन धर्माच्या शाश्वत स्वरूपाचे प्रतीक असलेल्या विनाश आणि दुर्लक्षातून पुन्हा उदयास येत आहे. रामलाला मंदिरात 550 वर्षांनंतर होणारा प्राणप्रतिष्ठा सोहळा शहरासह जगभरातील सुमारे एक अब्ज हिंदूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
टेक्सासमधील ‘श्री सीता राम फाऊंडेशन’चे कपिल शर्मा म्हणाले की, 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या धाममध्ये प्रभू रामाच्या मंदिराची उभारणी हा जगभरातील हिंदूंसाठी श्रद्धा आणि उत्सवाचा महत्त्वाचा दिवस आहे.
सांस्कृतिक कार्यक्रम होणार
श्री सीता राम फाउंडेशनने ह्यूस्टन येथील मंदिरात श्री रामजन्मभूमी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले आहे. मंदिरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. हवन देखील होणार आहे. प्रभू रामाची मिरवणूक काढली जाणार आहे. भंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर शनिवारी वॉशिंग्टनमध्ये राम मंदिर उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पाकिस्तानी अमेरिकन देखील ग्रेटर वॉशिंग्टन परिसरातील उत्सवात सहभागी होतील.
अयोध्येतील राम मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले असून २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे. शुक्रवारी रामलल्ला राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाले आहेत. मूर्तीचे फोटो ही समोर आले आहेत. ज्यामध्ये रामलल्लाच्या बालपणाची मूर्ती दिसत आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने देशातच नाही तर परदेशातही उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटी आणि मोठे उद्योगपती. नेते उपस्थित राहणार आहे. यासाठी अयोध्येत जोरदार तयारी करण्यात आली आहे.