सावधान, पृथ्वीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत सापासारखे सरपटणारे एलियन्स, वाचा वैज्ञानिक प्राध्यापकांनी काय दिलाय आश्चर्यजनक इशारा
त्यांनी दावा केला आहे की अनेक परग्रहवासी प्रजाती अशा आहेत की ज्या मानवांच्या संपर्कात आहेत. या परग्रहवासियांनी इशारा दिला आहे की, सरपटणारे परग्रहवासी पृथ्वीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत.
वॉशिंग्टन – गेल्या अनेक वर्षांपासून परग्रहावर असलेल्या मानवी वस्तीच्या आणि जीवनाच्या शोधात मानव आहे. मात्र एका प्राध्यापकाने आश्चर्यचकीत करणारा दावा केला आहे. क्वीसलँड विद्यापीठात तत्वज्ञानात पीएचडी करणारे प्राध्यापक डॉ. मायकल सल्ला यांनी दावा केला आहे की, एक आक्रमक सरपटणाऱी प्रजाती ही मानवावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नात आहे. संपूर्ण देशात फॅसिस्ट कायद्याची व्यवस्था स्थापित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
Unedited interview this article is based on happened around 2004. Recent info suggests Reptilian threat was neutralized as discussed in my Galactic Federations book. “Aggressive alien reptilians want to lead ‘fascist’ system on Earth, professor claims” https://t.co/SpwlmeOhxq
हे सुद्धा वाचा— Michael Salla (@MichaelSalla) June 11, 2022
काय आहे या प्राध्यापकांचा सविस्तर दावा
परग्रहवासी किंवा एलियन्स मानवाच्या राजकारणाला कसे प्रभावित करु शकतील, यावर प्राध्यापक मायकल सल्ला यांचे अध्ययन सुरु आहे. एलियनशी संबंधित विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि आश्चर्यचकित करणारी त्यांची थियरी त्यांनी जगासमोर मांडलेली आहे. जेसल यू ट्यूब चॅनेलवर झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी नवी माहिती दिली आहे. यात त्यांनी दावा केला आहे की अनेक परग्रहवासी प्रजाती अशा आहेत की ज्या मानवांच्या संपर्कात आहेत. या परग्रहवासियांनी इशारा दिला आहे की, सरपटणारे परग्रहवासी पृथ्वीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात आहेत.
सरकारांशी सुरु आहेत या परग्रहवासियांची बोलणी
डॉ. मायकल सल्ला यांचा दावा आहे की, त्यांच्याकडे वेगवेगळ्या परग्रहवासियांचे फोटो आहेत, जे अनेकदा आपल्या आजूबाजूला वावरतात. त्यांचा एकूण आकडा सांगता येणार नाही, पण वेळोवेळी हा आकडा बदलत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यातील अनेक प्रजातींच्या एलियन्सना मानवांच्या प्रकरणांमध्ये स्वारस्य आहे. यातील काही प्रजातींनी अनेकदा मानवांच्या प्रकरणांत सरळपणे हस्तक्षेपही केलेला आहे. त्यांनी यापुढे जाून असे सांगितले आहे की, त्यांच्या संशोधनात त्यांनी १७ वेगवेळच्या परग्रहवासियांच्या प्रजातींना ओळखले आहे. जे सरळ सरळ मानवांशी संवाद साधत आहेत. यातल्या ६ प्रजाती या सरकारांसोबत करार करीत आहेत, तर ११ प्रजाती सर्वसामान्य नागरिकांशी बोलत आहेत.
ग्लोबल वॉर्मिंगबाबत सरपटणाऱ्या एलियन्सना चिंता
अनेकदा हे एलियन्स मनुष्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांना उडत्या तबकड्यांत घेऊन जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यातले अनेक परग्रहवासी हे सरपटणारे आहेत, असा त्यांचा दावा आहे. अनेक चांगले परग्रहवासीही पृथ्वीवर हजारो वर्षांपासून असल्याचाही त्यांचा दवा आहे. या एलियन्सनी जेनेटिक इंजिनिअरिंग आणि मानवाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांनी हेही सांगितले आहे की, सरपटणाऱे एलियन्स ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यामुळे चिंतित आहेत. तर काही सरपटणाऱ्या प्रजाती यांची वृत्ती चांगली नसून, त्यांना पृथ्वीवर फॅसिस्टवादी व्यवस्था निर्माण करायची आहे.