हमें खुशी है कि… भारत-चीन दरम्यानच्या थरारानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया

आपलं सैन्य आपल्या देशांच्या सीमामंचं संरक्षण करण्यास सक्षम आहे, हे मी विश्वासाने स्पष्ट करतो. कोणत्याही हल्ल्याला आणि घुसखोरीला रोखण्यासाठी आपलं सैन्य तयार आहे.

हमें खुशी है कि... भारत-चीन दरम्यानच्या थरारानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया
हमें खुशी है कि... भारत-चीन दरम्यानच्या थरारानंतर अमेरिकेची पहिली प्रतिक्रियाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 9:10 AM

वॉशिंग्टन: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्यांच्या दरम्यान जोरदार संघर्ष झाला. त्यानंतर दोन्ही देशाच्या सैन्यांनी माघारही घेतली. या संघर्षानंतर अमेरिकेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संघर्षानंतर भारत आणि चीनच्या सैन्यांनी तात्काळ माघार घेतली. याबद्दल बायडेन प्रशासनाने आनंद व्यक्त केल्याचं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव काराइन जीन पियरे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारत-चीन दरम्यानच्या संघर्षावर अमेरिका लक्ष ठेवून आहे. दोन्ही देशांनी सीमावादावर चर्चा करावी. द्विपक्षीय संवादातून दोन्ही देशांनी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे, असं मत काराइन जीन पियरे यांनी व्यक्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा

दोन्ही देशांच्या सैन्यांनी संघर्षानंतर तात्काळ माघार घेतली. त्याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. भारत आणि चीनने द्विपक्षीय संवादातूनच या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये शुक्रवारी भारत आणि चिनी सैन्यात संघर्ष झाला. यावेळी दोन्हीकडच्या सैनिकांना किरकोळ मारही लागला. यावेळी भारतीय सैनिकांनी चिनी सैनिकांना जशास तसे उत्तर दिले. या संघर्षात चिनी सैनिक सर्वाधिक जखमी झाले.

9 डिसेंबर रोजी तवांगमध्ये यांग्त्से परिसरात वास्तविक नियंत्रण रेषेचं चिनी सैन्य उल्लंघन करत होतं. भारतीय सैन्याने अत्यंत चिवट झुंज देत चिनी सैनिकांची घुसखोरी रोखली. यावेळी दोन्ही सैन्यात संघर्ष झाला. त्यात आपला एकही जवान शहीद झाला नाही. कोणताच सैनिक गंभीर जखमीही झाला नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसंदेत स्पष्ट केलं.

आपलं सैन्य आपल्या देशांच्या सीमामंचं संरक्षण करण्यास सक्षम आहे, हे मी विश्वासाने स्पष्ट करतो. कोणत्याही हल्ल्याला आणि घुसखोरीला रोखण्यासाठी आपलं सैन्य तयार आहे. आपल्या सैन्याच्या साहस आणि धाडसाचं हे सभागृह समर्थन करेल याचा मला विश्वास आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.