पाकिस्तानला मोठा झटका, या कारणामुळे देश सोडून जात आहेत उद्योगपती

पाकिस्तानमध्ये नुकताच निवडणुका पार पडल्या आहेत. ज्यामध्ये कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पाकिस्तान आधीच संकटात सापडला असताना आता पाकिस्तानातील व्यापारी आणि उद्योगपती देश सोडून जात आहेत. अनेक जण आपल्या कुटुंबासोबत दुबईमध्ये स्थलांतरीत झाले आहेत.

पाकिस्तानला मोठा झटका, या कारणामुळे देश सोडून जात आहेत उद्योगपती
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 8:28 PM

Pakistan election : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. पण कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. पण या राजकीय परिस्थितीमुळे पाकिस्तानी व्यापारी चांगलेच घाबरले आहेत. गेल्या 20 महिन्यांत पाकिस्तानील व्यापारी आणि श्रीमंत व्यक्ती हे पाकिस्तानऐवजी दुबईमध्ये गुंतवणूक करत आहेत. पाकिस्तानातील व्यापाऱ्यांच्या त्यांच्याच देशावर विश्वास नसल्याचं दिसून येत आहे.

व्यापारी पाकिस्तान का सोडत आहेत?

पाकिस्तानातील बऱ्याच उद्योगपतींनी त्यांचा व्यवसाय दुबईत शिफ्ट केला आहे. अनेक जण त्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम निश्चित होत आहे. पाकिस्तान आधीच दिवाळखोरीच्या मार्गावर आहेत. त्यात देशात नोकऱ्या नाहीत. त्यामुळे देशाचं मोठं नुकसान होत आहे.

व्यापारी का सोडून चाललेत?

एका रिपोर्टनुसार देशातील बिघडलेली कायदा आणि सुव्यस्था, राजकीय परिस्थिती यामुळे व्यापारी दुबईत जात आहेत. देशात खंडणीचे प्रमाण देखील वाढत आहे, त्यामुळे देखील व्यापारी चिंतेत आहेत.

अनेक व्यावसायिक आधीच कुटुंबासोबत दुबईत स्थलातरीत झाले आहेत. अनेकांनी परदेशात व्यवसाय थाटला आहे. पाकिस्तानी वस्तूंची निर्यात आणि आयात यावर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

दुबईला का पहिली पसंती?

दुबईतून व्यवसाय करणे हे सोपे काम आहे. कारण निर्यात किंवा आयातीसाठी खाती उघडण्यास कोणतीही अडचण येत नाही. दुबईमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे असते.

नवीन सरकार आल्यानंतर देखील पाकिस्तानची अर्थव्यवस्था वर आणण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात. पाकिस्तानातील अस्थिरता हे देशासाठी मोठे धोक्याचे ठरत चालले आहे. पाकिस्ताना कोणत्याही सरकारला पाच वर्ष पूर्ण करणे कठीण जात आहे. पाकिस्तानचे शेजारील देशांसोबत बिघडलेले संबंध हे देखील याला जबाबदार आहेत. कारण त्यांच्यासोबत त्यांना व्यापार करणे कठिण होऊन जाते.

पाकिस्तानचे आधीच भारतासोबत संबंध बिघडले आहे. त्यानंतर आता त्यांचे इराणसोबत देखील संबंध बिघडले. चीन हा देश आपल्या फायद्यासाठी त्यांना मदत करतो. पण चीनच्या कर्जाखाली देखील ते बुडत चालले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.