Pakistan Blast : पाकिस्तानात रेल्वे स्टेशनवर शक्तीशाली बॉम्ब स्फोट, मोठ्या प्रमाणात मृत्यू, अनेक जखमी

Explosion at Pakistan Quetta Railway Station : पाकिस्तानात क्वेटा रेलवे स्टेशन मोठा शक्तीशाली बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात अनेकांचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.

Pakistan Blast : पाकिस्तानात रेल्वे स्टेशनवर शक्तीशाली बॉम्ब स्फोट, मोठ्या प्रमाणात मृत्यू, अनेक जखमी
Explosion at Pakistan Quetta Railway Station
Follow us
| Updated on: Nov 09, 2024 | 11:04 AM

पाकिस्तानात क्वेटा रेल्वे स्टेशनवर मोठा स्फोट झालाय. या भीषण स्फोटात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झालाय. यापेक्षा अधिक संख्येने लोक जखमी झालेत. माहितीनुसार, मृतांचा आकडा वाढू शकतो. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलय. पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालय. बॉम्ब निकामी पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलय. घटनेची चौकशी सुरु झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, क्वेटामध्ये दोन बॉम्बस्फोट झालेत. एका स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या स्फोटात जवळपास 15 लोक जखमी झाले. हा बॉम्ब स्फोट कोणी केला? का केला? याची चौकशी सुरु आहे. सध्या या स्फोटांची जबाबदारी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी स्टेशन परिसरात मोठी गर्दी होती. कारण इथून एक पॅसेंजर ट्रेन जाणार होती आणि एक पॅसेंजर ट्रेन येणार होती.

त्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला

स्फोटानंतर क्वेटा रेल्वे स्टेशनवर एकच गोंधळ झाला. धावपळ सुरु झाली. तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, हा मोठा बॉम्ब स्फोट होता. माहितीनुसार, जाफर एक्सप्रेस भिंडीच्या दिशेने चाललेली, त्यावेळी हा बॉम्बस्फोट झाला.

शाळेजवळ बॉम्बस्फोट

पाकिस्तानात बॉम्बस्फोट होणं आता सामान्य होत चाललय. तिथे अनेक दहशतवादी गट सक्रीय आहेत. त्यामुळे बॉम्बस्फोट होत असतात. काही दिवसांपूर्वी सुद्धा असाच बॉम्बस्फोट झाला होता. पाकिस्तानच्या अशांत नॉर्थ वजीरिस्तानमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात चार सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झालेले. त्याशिवाय खैबर पख्तूनख्वा येथे एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात दोन लहान मुलांचा मृत्यू झालेला.

बाइकवर IED लावून स्फोट

त्याआधी पाकिस्तानच्या अशांत बलूचिस्तान भागात एका शाळेजवळ बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात पाच शाळकरी मुलांसह सात जणांचा मृत्यू झालेला. 22 जण जखमी झालेले. बाइकवर IED लावून स्फोट झाला होता. या स्फोटानंतर क्वेटामध्ये सर्व रुग्णालयात इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.