Mars new discovery: मंगळावर चांदीसारख्या दिसणाऱ्या खनिजाबाबत मोठी माहिती हाती, 3अब्ज वर्षांपूर्वी स्फोटामुळे झाले तयार, काय आहे घ्या जाणून?
नासाच्या (Nasa) क्युरियोसिटी रोव्हरने 30 जुलै 2015 रोजी 154 किलोमीटर गेल क्रेटरवर एका मोठ्या खडकाच्या आत हे खनिज शोधून काढले होते. या रोव्हरने या मोठ्या खडकावर, छोटे छिद्र केले होते. याच्यातून चांदीसारखा दिसणारे एक खनिज बाहेर आले होते.
वॉशिग्टंन- मंगळ ग्रहावर (Mars)सात वर्षांपूर्वी एक गूढ चांदासारखे (silver)खानिज हाती लागले होता. या खनिज धातूच्या शोधामुळे वैज्ञानिक आश्चर्यचकित झाले होते. हा धातू मंगळ ग्रहावर कसा तयार झाला, असा प्रश्न अनेक संशोधकांच्या मनातही रेंगाळत होता. आता संशोधकांनी दावा केला आहे की, हे खनिज निर्माण कसे झाले, याचे रहस्य त्यांनी शोधून काढलेले आहे. पृथ्वीवार सामान्यपणे सापडणारा हे खनिज मंगळ ग्रहावर, 3 अब्ज वर्षांपूर्वी झालेल्या एका ज्वालामुखीच्या स्फोटात बाहेर आले होते, असा संशोधकांचा दावा आहे. नासाच्या (Nasa) क्युरियोसिटी रोव्हरने 30 जुलै 2015 रोजी 154 किलोमीटर गेल क्रेटरवर एका मोठ्या खडकाच्या आत हे खनिज शोधून काढले होते. या रोव्हरने या मोठ्या खडकावर, छोटे छिद्र केले होते. याच्यातून चांदीसारखा दिसणारे एक खनिज बाहेर आले होते. क्युरि्योसिटीत असलेल्या एक्स रे प्रयोगशाळेनत हा धातू ट्रायडीमाईट असल्याचे सिद्ध झाले होते. हे खनिज-धातू पूर्णपणे सिलिकॉन डाय ऑक्साईड पासून तयार होतो. काही ज्वालामुखींच्या उद्रेकावेळी हा धातू तयार होतो. मंगळावर अशा प्रकारचा एखादा शोध लागेल, याची कल्पनाच संशोधकांनी केलेी नव्हती.
ट्रायडिमाइटचा शोध का महत्त्वाचा
मंगळावरील गेल क्रेटरमध्ये ट्रायडिमाइटचा शोध आश्चर्यजनक असल्याचे मत नासातील मिशनच्या विशेषज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या 10 वर्षांतील हा सर्वाधिक आश्चर्यजनक शोध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याची दोन कारणेही सांगण्यात येतात. मंगळावर होत असलेल्या ज्वालामुखीतून ट्रायडीमाईट सारखी सिलिकायुक्त खनिजे होऊ शकत नाहीत, हे ज्वालामुखी उपयुक्त नाहीत असे मानण्यात येत होते. तसेच गेल क्रेटर हा भाग जुना तलाव असल्याचे मत वैज्ञानिकांचे होते. त्याच्या आसपास कोणताही ज्वालामुखी नसेल असे त्यांना वाटत होते.
नव्या शोधातून काय निष्पन्न
संशोधकांना असा संशय आहे की, या अज्ञात ज्वालामुखीच्या स्फोटानंतर, ट्रायडीमाईटची राख मंगळावरील आकाशात उडाली असे. त्यानंतर ती राख गेल क्रेटरच्या प्राचीन तलावात पडली असले. ट्रायडीमाईट पाण्यात पडल्यानंतर, रासायनिक प्रक्रिया होऊन ते वेगवेगळ्या तुकड्यात विभागले गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ट्रायडीमाईटचे सँपल्स एवढे शुद्ध स्वरुपात मिळालेले आहेत. जर पाणी नसते तर या धातूचा सलग तुकडा मिळाला असता, असे तसंशोधकांना वाटते आहे.
कधी झाले हे कसे समजले
वैज्ञानिक मंगळावरील ज्वालामुखीच्या काळाचा अंदाजही बांधत आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की हे क्रेटर 3ते 3.5अब्ज वर्षांपूर्वी पाण्याने भरलेले होते. जर त्यात ट्रायडीमाईट पडले असेल तर साधारण तितक्याच वर्षांपूर्वी या ज्वालामुखीचा स्फोट झाला असण्याची शक्यता आहे.