Pakistan Under Attack | पाकिस्तान पुन्हा फुटण्याच्या मार्गावर, ‘या’ दोन शहरांवर BLA चा ताबा
Pakistan Under Attack | BLA ने पाकिस्तानी सैन्य ठिकाणांवर हल्ला करुन दोन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. सोबत एक व्हिडिओ जारी केलाय. बीएलएच्या सैनिकांनी तिथल्या लोकांना घरातच थांबण्यास सांगितलं आहे. बीएलएचे दावे पाकिस्तानने फेटाळून लावले आहेत.
Pakistan Under Attack | BLA ने त्यांना मदत करणाऱ्या अन्य संघटनांच्या मदतीने पाकिस्तानातील सैन्य ठिकाणांवर हल्ला केलाय. बीएलएने पाकिस्तानच्या माच आणि बोलन शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानने मात्र हा दावा फेटाळून लावलाय. बीएलएच्या ताब्यानंतर पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे पडणार असल्याची चर्चा सुरु झालीय. बीएलए आपला दावा खरा आहे हे सिद्ध करण्यासाठी पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय मीडियाला तिथे बोलावलय.
पाकिस्तान पुन्हा एकदा फुटणार असल्याच दिसत आहे. सूत्रांच्या माहितानुसार, 1971 प्रमाणे पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे पडू शकतात. एका नव्या देशाची निर्मिती होऊ शकते. याच कारण बलूच लिबरेशन आर्मी आहे. त्यांच्याकडून पाकिस्तानी सैन्य तळांवर हल्ले सुरु आहेत. बलूच लिबरेशन आर्मी पाकिस्तानचा पश्चिमी प्रांत बलूचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहे.
पाकिस्तानचे किती सैनिक मारल्याचा दावा?
बोलन आणि माच शहरांवर हल्ला करुन ही दोन्ही शहर ताब्यात घेतल्याचा BLA चा दावा आहे. माच शहरावरील हल्ल्यात बीएलएने पारिस्तानचे 45 सैनिक आणि गॅबमध्ये 10 लोकांना संपवलं. पाकिस्तानने बीएलएचा दावा फेटाळून लावलय. आमचा एकही सैनिक मारला गेलेला नाही, असं पाकिस्तानने म्हटलं आहे.
‘ऑपरेशन दारा-ए-बोलन’
ब्लूचिस्तानवरील एका रिपोर्टमध्ये असं म्हटलय की, माच आणि बोलन शहरावर ताबा मिळवण्यासाठी बीएलएने ‘ऑपरेशन दारा-ए-बोलन’ केलं. या शहरांच्या आसपासच्या भागावर ताबा मिळवलाय. या ऑपरेशनमध्ये बीएलएसोबत जैसेमजीद ब्रिगेड, फ़तेह स्क्वाड आणि स्पेशल टॅक्टि कल ऑपरेशन स्क्वाड (STOS) सहभागी झाले होते. या टीम्सच्या मदतीने बीएलएने हे ऑपरेशन केलं.
एंट्री तसेच एग्जिट प्वाइंट ताब्यात
बीएलएच्या एका प्रवक्त्याच वक्तव्य समोर आलय. प्रवक्ता जीयांद बलूचने मीडियाशी संवाद साधला. STOS टीम्सनी पाकिस्तानी फोर्सला रोखण्यासाठी लँड माइन विस्फोटकांचा वापर केला. भागातील आसपासचे एंट्री तसेच एग्जिट प्वाइंट ताब्यात घेतलेत. दुसऱ्याबाजूला फतेह टीमने रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशनसह माच शहरातील रणनीतिक जागा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. माच शहर 24 तासापेक्षा पण जास्त वेळेपासून आपल्या ताब्यात आहे. बीएलएने हे पटवून देण्यासाठी एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय.