संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टात घुसून हजारो नागरिकांची तोडफोड; श्रीलंकेनंतर कुठे घडली ही घटना?
ब्राझिलमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत बोलसोनारो यांचा पराभव झाला. तसेच लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांचा विजय झाला.
ब्राजीलिया : ब्राझिलचे माजी राष्ट्रपती जायर बोलसोनारो यांच्या समर्थकांना राजधानी ब्राजीलियामध्ये प्रचंड राडा केला आहे. नवे राष्ट्रपती म्हणून लुइज इनासियो लुला डि सिल्वा यांनी शपथ घेतल्याने बोलसोनारो यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. या आंदोलकांनी थेट बाझिलच्या काँग्रेसमध्ये (संसद), राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसून धुडगूस घातला आहे. प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 400 लोकांना अटक केली आहे. तर या हिंसाचारानंतर ब्राझिलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.
All eyes need to be on Brazil right now. Democracy is completely under attack. Bolsonaro supporters are invading Congress, the presidential palace, and realms of power in Brazil. Unbelievable scenes.
— Dr. Jennifer Cassidy (@OxfordDiplomat) January 8, 2023
ब्राझिलमध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत बोलसोनारो यांचा पराभव झाला. तसेच लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांच्या नेतृत्वाखालील डाव्या पक्षांचा विजय झाला. त्यामुळे लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांनी तिसऱ्यांचा ब्राझिलच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. मात्र, बोलसोनारो यांच्या समर्थकांनी हा निकाल अमान्य असल्याचं सांगत जोरदार हंगामा केला आहे.
बोलसोनारो यांचे हजारो समर्थक अचानक रस्त्यावर आले. रविवारी त्यांनी सुरक्षा कवच भेदून संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसखोरी केली. त्यानंतर या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देत तोडफोड करून जाळपोळ सुरू केली.
संसदेच्या खिडक्या तोडून टाकल्या. फर्निचरची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी 400 आंदोलकांना अटक केली असून सरकारी इमारती रिकाम्या केल्या आहेत.
आम्ही सर्व आंदोलकांची ओळख पटवत आहोत. जे या दहशतवादी कृत्यात सामिल आहेत. त्यांना शिक्षा भोगावीच लागणार आहे, असं गव्हर्नर इवानिस रोचा यांनी सांगितलं.
दरम्यान, ब्राझिलमधील या घटनेवर अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ब्राझिलचे माजी राष्ट्रपती बोलसोनारो यांच्या समर्थकांनी देशाची संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयावर हल्लाबोल करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. ब्राझिलच्या लोकशाही संस्थाना अमेरिकेचं संपूर्ण पाठबळ आहे, असं जो बायडेन यांनी स्पष्ट केलं.