टेलर स्विफ्ट Twitter वर सर्वात प्रभावशाली व्यक्ती, पंतप्रधान मोदी दुसऱ्या क्रमांकावर तर सचिनची झाली एंट्री; बघा पुर्ण यादी
अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट (Taylor Swift) हिने पहिल्या क्रमांक पटकावला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर 35 व्या क्रमांकावर आहे.
यावर्षी ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट (Taylor Swift) हिने पहिल्या क्रमांक पटकावला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर 35 व्या क्रमांकावर आहे. सचिनची ही ट्विटरवरील 50 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्यांदाच नाव आलं आहे. एंट्रीमध्येच सचिनने अमेरिकन अभिनेते ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson), लिओनार्डो डी कॅप्रिओ (Leonardo Di Caprio) आणि युनायटेड स्टेट्सच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा (Michelle Obama) यांच्यासारख्या प्रसिद्ध लोकांना मागे टाकले आहे. भारतीयांसाठी आणि जगभरातील सचिनच्या चाहत्यांसाठी ही खुप आनंदाची बातमी आहे. (Most influential people on Twitter, PM Narendra Modi on second, Sachin Tendulkar also in the list)
? Brandwatch’s Most Influential People on Twitter 2021 ?
3. @katyperry 2. @narendramodi
???
— Brandwatch (@Brandwatch) November 4, 2021
ब्रँडवॉच कंपनीद्वारे केलेल्या संशोधनानुसार ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ब्रँडवॉच त्यांच्या संशोधनाकरता सोशल मीडिया डेटाचा वापर करते. संशोधनात सचिनचा यादीत समावेश करताना उल्लेख “गरजुंसाठी प्रशंसनीय कार्य, योग्य कारणांसाठी आवाज उठवणं आणि उपस्थित राहणं, त्याच्या कार्याचे अनुसरण करणारे त्याचे चाहते आणि त्याच्या ब्रँड्सच्या प्रभावी मोहिमा”, असा करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार, सचिन राज्यसभेचा खासदार देखील राहीलेला आहे. एक दशकाहून अधिक तो UNICEF सोबत काम करतोय आणि 2013 मध्ये त्याची दक्षिण आशियासाठी राजदूत (Ambassador for South Asia) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
? Brandwatch’s Most Influential People on Twitter 2021 ?
Congratulations to our list first timers, such as @Beyonce , @takapon_jp, and @sachin_rt.
Although Beyonce fans may be shocked to see her behind @elissakh, one of Lebanon’s biggest singers. https://t.co/TCAnhZ2o9t
— Brandwatch (@Brandwatch) November 4, 2021
Other News