Breaking News: अमेरीकेत कोरोनाचा स्फोट, दरदिवशी लाख जणांना नव्यानं लागण, पश्चिम यूरोपात प्रत्येक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण

ओमिक्रॉन (Omicron Variant) हा डेल्टापेक्षा (Delta) घातक आहे पण अजून तरी कुठल्याच देशातून मृत्यूचा भीतीदायक आकडा समोर आलेला नाही. पण म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही. कारण ओमिक्रॉनचा अभ्यास प्राथमिक टप्यात आहे. आता त्याचे गंभीर परिणाम दिसत नसले तरी पुढं त्यामुळे काय उद्भवेल याची माहिती नसल्याचं जाणकारांना वाटतं.

Breaking News: अमेरीकेत कोरोनाचा स्फोट, दरदिवशी लाख जणांना नव्यानं लागण, पश्चिम यूरोपात प्रत्येक देशात ओमिक्रॉनचे रुग्ण
अमेरीकेत कोरोनाचे दरदिवशी 1 लाख रुग्ण सापडतायत
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 7:11 AM

अमेरीकेत कोरोनाचा अक्षरश: स्फोट झालाय. तिथं दिवसाला 1 लाख नवे कोरोना रुग्ण सापडतायत. गेल्या पाच दिवसात रुग्ण मिळण्याची ही संख्या कायम आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेतही अमेरीकेनं (America Daily Corona Cases) जगाला धडकी भरवली होती आणि आता ऐन ख्रिसमसच्या  आधी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण मिळत असल्यानं भीती व्यक्त केली जातेय. राष्ट्रपती बायडन यांनी अनेक नव्या नियमांची, निर्बंधांची घोषणा केलीय. विशेष म्हणजे यात ओमिक्रॉनच्या (America Omicron Cases) संशयित रुग्णांची संख्या मोठी आहे. तर दुसरीकडे पश्चिम यूरोपात जवळपास प्रत्येक देशात आता ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळेच आफ्रिका, पश्चिम यूरोप आणि अमेरीका हे तिनही खंड कोरोनाच्या विळख्यात सापडलेत.

लसीचा सर्वात मोठा इफेक्ट अमेरीका तसच आफ्रिकेतल्या कोरोनाच्या लागण होण्याच्या प्रमाणात एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आलीय. ती म्हणजे लसीचा इफेक्ट. अमेरीकेत ज्यांनी लस घेतलेली नाही अशांना कोरोनाची लागण तसच ओमिक्रॉनची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसच लस न घेतलेल्यांचं मृत्यूचं प्रमाणही घेतलेल्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे आपल्याकडेही ज्यांनी एकच लस घेतलीय त्यांनी दुसरी लस घेणही गरजेचं आहे. ओमिक्रॉनविरुद्धच्या लढ्यात लस हाच फॅक्टर मोठी भूमिका वठवण्याची शक्यता जाणकार व्यक्त करतायत.

यूरोप-आफ्रिकेत उद्रेक अमेरीकेत दिवसाला एक लाख रुग्ण सापडतायत, आफ्रिका, यूरोपची आकडेवारीही चिंताजनक आहे. (Omicron Cases Europe Africa) आगामी काळ ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आहे. त्यामुळे गर्दी, पर्यटन, भेटीगाठी ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ह्या आकडेवारीत आणखी भर पडण्याची भीती व्यक्त केली जातेय. दक्षिण आफ्रिकेतल्या बहुतांश देशातही ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत. दक्षिण आफ्रिकेत दिवसाला 4 हजार रुग्ण सापडतायत. पॉझिटिव्हिटी रेट हा 24 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 16,055 एवढे नवे रुग्ण सापडलेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही टक्केवारी 468 टक्क्यानं अधिक आहे. इंग्लंडमध्ये ओमिक्रॉनचे 75 नवे रुग्ण सापडलेत. एकूण संख्या 134 एवढी आहे. इस्त्रायलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कोरोनानं एकही मृत्यू नाही. ओमिक्रॉनची भीती इस्त्रायलमध्येही आहे. इतर देशांशी सीमाही बंद केल्या गेल्यात. ओमिक्रॉन (Omicron Variant) हा डेल्टापेक्षा (Delta) घातक आहे पण अजून तरी कुठल्याच देशातून मृत्यूचा भीतीदायक आकडा समोर आलेला नाही. पण म्हणून हुरळून जाण्याचं कारण नाही. कारण ओमिक्रॉनचा अभ्यास प्राथमिक टप्यात आहे. आता त्याचे गंभीर परिणाम दिसत नसले तरी पुढं त्यामुळे काय उद्भवेल याची माहिती नसल्याचं जाणकारांना वाटतं.

हे सुद्धा वाचा : Weight Loss Tips : फक्त ‘या’ 4 एक्सरसाइज करा आणि पोटावरील चरबी कमी करा! Surya Grahan 2021 | सूर्यग्रहणाचा या 5 राशी परिणाम होणार, काळ कठीण असला तरी अनुभव मिळणार

ठाण्यातील शहापूरमध्ये दोन दिवसात शिवसेनेला दुसरा धक्का, नगरसेवकांसह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.