Barry Austin | 40 बॉटल बिअर, 12 लीटर सोडा, दिवसाला 29 हजार कॅलरीज, ब्रिटनच्या 412 किलोच्या व्यक्तीचं निधन
52 वर्षांच्या वयात बॅरी ऑस्टिन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यावेळी त्यांचं वजन 412 किलो इतकं होतं.

लंडन : एकेकाळी ब्रिटनचा (Britain) सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅरी ऑस्टिनचं (Barry Austin Died) निधन झालं आहे. 52 वर्षांच्या वयात बॅरी ऑस्टिन यांनी जगाचा निरोप घेतला आहे. यावेळी त्यांचं वजन 412 किलो इतकं होतं. त्यांना गेल्या काही वर्षांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. तसेच, ते संसर्गाच्या समस्येने ग्रसित होते. बॅरी यांच्या विनम्र स्वभावामुळे ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे (Barry Austin Died).
बॅरी ऑस्टिन हे ब्रिटनच्या बर्मिंघम येथे राहायचे. त्यांच्या डाएटमध्ये एकावेळी 29 कॅलरीजचा समावेश असायचा. लहान वयात बॅरी ऑस्टिन यांचं वजन सामान्य मुलांप्रमाणेच होतं. पण, त्यानंतर त्यांच्या गरजेपेक्षा जास्त खाण्याच्या सवयीमुळे त्यांचं वजन वाढत गेलं. त्यामुळे त्यांना ब्रिटनचा सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आलं. त्यांनी एका विनोदी मालिकेतही काम केलं होतं. बर्मिंघम सिटी फुटबॉल क्लबने ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या निधनाची माहिती दिली.
दररोज 29 हजार कॅलरीजचं सेवन
एका सामान्य व्यक्तीला दररोज दोन हजार ते तीन हजार कॅलरीजची गरज असते. पण, बॅरी ऑस्टिन हे दररोज तब्बल 29 हजार कॅलरीजचं सेवन करत होते. बॅरी ऑस्टिन यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सावत्र मुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला शोक व्यक्त केला आहे.
एकेकाळी ऑस्टिन हे कॅब ड्रायव्हर म्हणून काम करायचे. वजन कमी करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन देखील केलं होतं.
2012 मध्ये त्यांनी लग्नासाठी तब्बल 127 किलो वजन कमी केलं होतं. वजन कमा केल्यानंतरही त्यांना आरोग्यासंबंधी अनेक समस्या उद्भवत होत्या (Barry Austin Died).
एकेकाळचा देशातील सर्वात लठ्ठ व्यक्ती
एकेकाळी बॅरी यांचं वजन तब्बल 445 किलो आणि ते ब्रिटनचे सर्वात लठ्ठ व्यक्ती होते. पण त्यानंतर सरे येथील जेसन हॉल्टनने त्यांना मागे सोडलं. हॉल्टन यांना गेल्यावर्षी अग्नीशमन दलाच्या मदतीने घरातून बाहेक काढण्यात आलं होतं.
बॅरी ऑस्टिन यांचं डाएट
बॅरी ऑस्टिन हे सकाळच्या नाश्त्यात सहा पोर्क सॉसेज, तीन हॅश ब्राऊन, सहा तळलेली अंडी, सहा बेकन, पाच बटर टोस्ट खायचे. यानंतर ते दुपारच्या जेवणात मासे आणि चिप्सचे दोन मोठे पॅकेट खायचे. त्याशिवाय, फॅमिली साईज स्ट्ऱबेरी ट्रिफलही खायचे. रात्रीच्या जेवणात ते चिकनचे 9 पॅकेट, सहा प्लेट भात, चार मोठे नान ब्रेड खायचे. इतकंच नाही तर ते रोज 12 लीटर सोडा आणि बिअरचे 40 पॉईंट प्यायचे.
Special Story : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार, किती धोकादायक, आता पुढे काय?https://t.co/mhNX6ykuA4#CoronaVirus | #NewCoronaStrain | #UK
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021
Barry Austin Died
संबंधित बातम्या :
चीनचे अब्जाधीश जॅक माला 2 महिन्यात 80 हजार कोटींचं नुकसान, नेमकं काय झालं?
विनामास्क प्रचार महागात, शपथेपूर्वीच नवनियुक्त खासदाराचा कोरोनाने मृत्यू
चीनमध्ये ‘भरपेट’ खाणाऱ्यांना दणका, अतिखादाडांना 1 लाखांचा दंड, नवा कायदा लागू