ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा

कोरोनाच्या नव्या रुपामुळे लंडनसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. Britain new corona variant

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे रुप, रुग्ण वाढले, ख्रिसमसच्या आनंदावरही मर्यादा
ब्रिटनमध्ये आता नवीन व्हेरिएंट AY.4.2 ची भीती
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 11:46 AM

लंडन: संपूर्ण जगात साडेसात कोटींहून जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूनचे नवे रुप समोर आले आहे. या रुपातील विषाणू वेगाने पसरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी शनिवारी याला दुजोरा दिला. क्रिस व्हिटी यांनी कोरोना विषाणूचे नवे रुप पहिल्या विषाणूपेक्षा वेगळे असेल, असं सांगितले. या विषाणूचा वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आवाहन क्रिस व्हिटी यांनी केले. (Britain witnessed corona virus new variant spread rapidly )

लंडनसह शहरासह इतर ठिकाणी निर्बंध

ब्रिटनमध्ये नव्यानं आढळलेल्या कोरोना विषाणूमुळे (Corona Virus) लंडनसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणू संसर्गामुळे ख्रिसमस आणि इतर सण पहिल्यासारखे साजरे करता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

ब्रिटनमध्ये पसरतोय नव्या रुपातील कोरोना

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना विषाणूचं नवे रुप आढळून आले असल्याचं स्पष्ट केले. कोरोनाचे नवे वेरियंट(स्ट्रेन) देशात पसरत आहे. यामुळे रुगणालयातील रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती बोरिस जॉन्सन यांनी दिली. रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यूंची संख्या वाढलेली नाही.

कोरोना विषाणू संसर्गाचे स्वरुप बदलले असेल तर आपल्याला देखील रणनिती बदलली पाहिजे, असं जॉन्सन यांनी स्पष्ट केले. कोरोना विषाणूचे हे वेरियंट आतापर्यंत दोन देसांमध्ये आढळले आहे. ब्रिटन सरकारकडून कोरोना विषाणूच्या स्वरुपाविषयी जागतिक आरोग्य संघटनेला माहिती देण्यात आली आहे. इतर देशांना ब्रिटनच्या नागरिकांवर प्रवासाला बंदी घालायची असल्यास त्याबाबत निर्णय घेण्यासाठी याची मदत होणार आहे, असंही ब्रिटन सरकारच्यावतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. (Britain witnessed corona virus new variant spread rapidly )

ब्रिटनमध्ये 10 लाख तर जगात 7.5 कोटी कोरोनाबाधित

सरकारच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी (18 डिसेंबरला) 28,507 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांतील आकडेवारी पाहिली असता त्यामध्ये 40.9 टक्के वाढ दिसून आलीय. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 10 लाख 98 हजार नागरिकांना कोरोना संसर्ग झाला आहे.

कोरोना विषाणू संसर्ग जगातील 7.55 कोटी नागरिकांना झालाय. आतापर्यंत 16.7 लाख लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. जगाची कोरोनाबाधित संख्या 7 कोटी 55 लाख 88 हजार 781 तर 16 लाख 72 हजार 826 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक कोटींच्यावर गेली आहे.

संबंधित बातम्या:

लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई नको, ‘या’ कारणांमुळे आदर पुनावाला यांची सरकारकडे मागणी

Corona | दिलासादायक…27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अ‌ॅक्टिव्ह केसेस 15 हजारांपेक्षा कमी

Britain witnessed corona virus new variant spread rapidly

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.