Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Britain | राणी एलिझाबेथनंतर कॅमिली यांना क्वीन कॉन्सर्टची उपाधी, मग या ब्रिटनच्या नव्या महाराणी का?

चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचे नवे महाराजा घोषित करण्यात आलंय. त्यांची पत्नी कॅमिली पार्कर यांना क्वीन कॉन्सर्ट ही उपाधी देण्यात आली. या उपाधीमुळे त्या ब्रिटनच्या महाराणी म्हणवल्या जाणार का, ही उत्सुकता लागलीय.

Britain | राणी एलिझाबेथनंतर कॅमिली यांना क्वीन कॉन्सर्टची उपाधी, मग या ब्रिटनच्या नव्या महाराणी का?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 6:45 PM

महाराणी एलिझाबेथ (Elizabeth) यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र चार्ल्स तृतीय यांना ब्रिटनचे नवे महाराजा घोषित झाले आहेत. त्यांची पत्नी कॅमिली पार्कर (Camily Parker) यांना क्वीन कॉन्सर्टची उपाधी देण्यात आली आहे. प्रिन्स चार्ल्स (Prince Charles) यांची पत्नी म्हणून कॅमिली यांना ही उपाधी देण्यात आली आहे. पण यामुळे त्यांना महाराणाचे अधिकार मिळणार का? राणी एलिझाबेथ यांच्यासारख्या पॉवर त्यांच्याकडे येणार का? शाही घराण्याचा नियम काय सांगतो? या उपाधीचा नेमका अर्थ काय?

काय आहे क्वीन कॉन्सर्ट पद?

ब्रिटनच्या राजघराण्यात जो वारसदार असतो, त्याच्या पत्नीला क्वीन कॉन्सर्ट हे पद दिलं जातं. तर महाराणीचं पद रिझर्व्ह ठेवलं जातं. शाही घराण्याशी संबंधित पिढीच्या व्यक्तीलाच हे पद मिळतं.

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, राज घराण्यात जन्मलेल्या मुलीलाच हे पद दिलं जातं. तिची जबाबदारी, महत्त्व आणि हुद्दा राजाच्या बरोबरीने असतो.

विशेष म्हणजे, आज कॅमिला यांना मिळालेलं क्वीन कॉन्सर्ट हे पद महाराणीच्या समकक्ष नाहीये. राज घराण्याच्या नियमानुसार, सिंहासनावर बसण्याचा अधिकार त्यालाच मिळतो, जो राजघराण्यात जन्मलेला असतो. मुलगा किंवा मुलगी.

त्यामुळे कॅमिला या त्यांचे पती चार्ल्स यांची राजकारभारात मदत करतील. पण त्यांना महाराणीचा दर्जा मिळणार नाही.

क्वीन कॉन्सर्ट यांना सरकारमध्ये कोणतंही पद दिलं जात नाही. सरकारी दस्तावेज सांभाळणे किंवा त्यावर स्वाक्षरी करण्याचीही परवानगीदेखील नसते.

ब्रिटिश साम्राज्य सांभाळण्यात मदत करणे, हेच त्यांचं मोठं काम. अर्थात हे पद मिळाल्यानंतर कॅमिला यांना इतरही काही पदं मिळतील. उदा. त्या ९० पेक्षा जास्त चॅरिटी संस्थांच्या अध्यक्ष झाल्या आहेत.

कॅमिला या चार्ल्सच्या दुसऱ्या पत्नी आहेत. पहिली पत्नी डायना स्पेंसर होत्या. डायना यांना घटस्फोट दिल्यानंतर कॅमिला यांच्याशी लग्न झालं होतं. दोघांनीही पहिल्या पार्टनरला घटस्फोट देऊन लग्न केलं होतं.

त्यामुळे कॅमिला यांना क्वीन कॉन्सर्ट पद मिळेल की नाही, हाच प्रश्न उपस्थित होत होता. मात्र यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी स्पष्ट केलं होतं. माझ्यानंतर कॅमिला यांना हे पद दिलं जावं, अशी इच्छा त्यांनी प्रकट केली होती.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.