British Diplomat coverts to Islam: सऊदी अरेबियाच्या ब्रिटीश मुत्सद्दीने इस्लाम धर्म स्वीकारला, फोटो शेअर करत केलं जाहीर

अशर यांनी म्हटले आहे की, 'मदीना या माझ्या आवडत्या शहरामध्ये परतताना आणि पैगंबरांच्या मशिदीमध्ये फजरची नमाज अदा करताना मला खूप आनंद होत आहे.' त्यांनी पुढे लिहिले की, ब्रिटीश मुस्लिम मदिना येथे परततील अशी मला मनापासून आशा आहे.

British Diplomat coverts to Islam: सऊदी अरेबियाच्या ब्रिटीश मुत्सद्दीने इस्लाम धर्म स्वीकारला, फोटो शेअर करत केलं जाहीर
Follow us
| Updated on: Nov 16, 2021 | 3:13 PM

जेद्दाह : ब्रिटनच्या एका मुत्सद्दीने (British Consule General) सऊदी अरेबियात (Saudi Arabia) इस्लाम धर्माचा स्वीकार केला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. याचा खुलासा करत त्यांनी मदिना येथील आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. जेद्दाहमधील ब्रिटीश कन्सुल जनरलने आता त्याचे नाव बदलून सैफ-अशर असे केले आहे. इस्लाम धर्म स्वीकारणारे अशर हे दुसरे ब्रिटिश कौन्सुल जनरल आहेत.

सोशल मीडियावर सैफ-अशरचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सैफ-अशर मदिनाच्या अल नवाबी मशिदीत उभे आहेत. अशर यांनी म्हटले आहे की, ‘मदीना या माझ्या आवडत्या शहरामध्ये परतताना आणि पैगंबरांच्या मशिदीमध्ये फजरची नमाज अदा करताना मला खूप आनंद होत आहे.’ त्यांनी पुढे लिहिले की, ब्रिटीश मुस्लिम मदिना येथे परततील अशी मला मनापासून आशा आहे. सैफ-अशर म्हणाले की, कोरोना महामारीपूर्वी येथे दरवर्षी एक लाखाहून अधिक प्रवासी यायचे. सऊदी अरेबियात सुरू असलेला उत्कृष्ट विकास आणि सुविधा लक्षात घेता ही संख्या आणखी वाढेल याची मला खात्री आहे.

याआधी, ब्रिटिश कौन्सुल जनरल कॉलिस यांनीही सऊदी अरेबियात इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 2016 मध्ये ते हजला पण गेले होते. इस्लाम धर्म स्वीकारण्यापूर्वी कॉलिसने सांगितले की, 30 वर्षे मुस्लिम समुदायांमध्ये राहिल्यानंतर आणि हुदाशी लग्न करण्यापूर्वी मी इस्लाम स्वीकारला.

इतर बातम्या-

इजिप्तमध्ये विंचवांनी नांगी आपटली, आतापर्यंत 500 जणांना दंश, बाहेर न पडण्याचं सरकारचं आवाहन

Covid Updates: चीनमधल्या झुआन्घे विद्यापीठ कॅम्पस लॉक, एकाएक 1,500 विद्यार्थी हॉटेलमध्ये स्थलांतरित

इक्वेडोरच्या तुरुंगात रक्तरंजित खेळ; कैद्यांचा एकमेकांवर बंदुक आणि स्फोटकांनी हल्ला, 68 ठार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.