आता पाकिस्तान नाही, ‘या’ देशात हिंदुंवर क्रूर अत्याचार, मंदिर तोडली, मारहाण, घर जाळली
पाकिस्तानात हिंदुंवर अत्याचार होतातच. पण आता आणखी एका देशात हिंदुंना टार्गेट केलं जातय. हिंदुंवर अत्यंत क्रूर पद्धतीने अत्याचार सुरु आहेत. मंदिर तोडली जातायत. मारहाण सुरु आहे. घरं पेटवण्यात आली. हिंदुंना पद्धतशीरपणे टार्गेट केलं जातयय
नवी दिल्ली : पाकिस्तानात हिंदुंवर अत्याचार होतातच. पण आता आणखी एका देशात अशाच घटना हिंदुंसोबत घडत आहेत. हा सुद्धा भारताचा शेजारी देश आहे. महत्त्वाच म्हणजे हा देशच भारतामुळे अस्तित्वात आलाय. पण या देशातील कट्टरपंथीय आता हिंदुंना टार्गेट करत आहेत. या देशात हिंदुंवर अत्याचार झाल्याच्या बातम्या याआधी सुद्धा आल्या आहेत. आता पुन्हा एकदा असच घडलय. एका ठिकाणी काही समाजकंटकांनी सरस्वती पूजा मंडपावर हल्ला करुन मातेची मुर्ती तोडली. दुसऱ्या प्रकरणात काही कट्टरपंथीयांनी हिंदू कुटुंबाला आपली घर आणि जमिनी सोडण्याची धमकी दिली आहे. एका प्रकरणात सरस्वती पूजा मंडप तोडण्यावरुन हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थ्यांमध्ये झडप झाली. एका भागात काही कंटकांनी हिंदुंची घर पेटवून दिली. हे सर्व घडतय शेजारच्या बांग्लादेशात.
पहिल प्रकरण ब्राह्मणबारिया जिल्ह्यातील पाइकपारा भागातील आहे. इथे काही अज्ञात समाजकंटकांनी एका सरस्वती पूजा मंडपावर हल्ला केला. त्यांनी सरस्वतीची मुर्ती तोडली. पोलीस ठाण्यात या बद्दल गुन्हा नोंदवूनही अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही. कोणालाही अटक झालेली नाही. त्यामुळे बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदुंच्या मनात संतापाची भावना आहे.
हिंदू कुटुंबांना बेदखल करण्याची धमकी
दुसरी घटना पटुआखली जिल्ह्यातील आहे. घुरचकाठी गावात काही हिंदू कुटुंबांना बेदखल करण्याची धमकी देण्यात आलीय. कट्टरपंथीय मुहम्मद हारून आणि अल अमीन यांनी हिंदू कुटुंबाना घर आणि जमीन सोडण्याची धमकी दिलीय. ते पैशाची मागणी करतायत.
हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थी भिडले
तिसरी घटना दिनाजपूर जिल्ह्यातील आहे. येथे बंशेरहाट स्थित हाजी दानेश विज्ञान एवं प्रौद्योगिकी विश्वविद्यालय काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजा मंडपात तोडफोड केली. त्यावरुन हिंदू आणि मुस्लिम विद्यार्थी भिडले.
चौथी घटना बांग्लादेशच्या फिरोजपुर जिल्ह्यातील आहे. इथे काही अज्ञात उपद्रवींनी डुमुरीतला शारिकतला संघमधील हिंदुंच्या घराना आग लावली. .