हॉटेल ग्रँड डायमंड सिटीत भीषण आग, जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या, 10 लोकांचा मृत्यू; कुठे घडली ही थरकाप उडवणारी घटना?
काहींनी तर खिडकीतून उड्या मारल्या. विशेष म्हणजे जीव वाचवण्यासाठी काही पर्यटकांनी थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचं सांगण्यात आलं.
नामपेन्ह : कंबोडियातील एका हॉटेलात भीषण आग लागली आहे. या आगीत दहा लोकांचा होरपळून मृत्यू जाला आहे. हॉटेल कॅसिनो ग्रँड डायमंड सिटीमध्ये ही आग लागली असून आगीत 30 लोक जखमी झाले आहेत. तर आगीत 50 हून अधिक लोक अडकले आहेत. या आगीचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात आगीच्या ज्वाळा भडकताना दिसत आहेत. आगीमुळे हॉटेलचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, या आगीवर नियंत्रण आणण्यात आलं आहे. हॉटेलच्या प्रत्येक रुमची तपासणी केली जात आहे. आग कशी लागली याचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
कंबोडियातील प्रमाणवेळेनुसार काल पहाटे ही भीषण आग लागली. या आगीत सकाळी 8 वाजेपर्यंत 53 लोकांची आगीतून सुटका करण्यात आली आहे. तर अद्यापही आगीत 50 लोक अडकलेले आहेत. सोशल मीडियावर या आगीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात आगीच्या ज्वाळांनी हॉटेलला घेरलं असल्याचं दिसून येत आहे. तर काही व्हिडीओ क्लिपमध्ये जीव वाचवण्यासाठी लोक हॉटेलमधून उड्या मारताना दिसत आहेत.
आग लागली तेव्हा हॉटेलात परदेशी नागरिकही उपस्थित होते. त्यामुळे या विदेशी नागरिकांची माहिती घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला जात आहे. तसेच आगीत जखमी झालेल्यांना थायलंडच्या सा केओ प्रांतातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.
ที่นั่น..#ปอยเปต 23:10น. เหตุไฟไหม้ ในส่วนห้องครัวชั้นล่างของ Grand Diamond City Casino &Resort น่าจะไฟฟ้าลัดวงจร ลามถึงชั้นบน เกิดกลุ่มควันไฟชั้นบน นักพนันหนีตายกันอลหม่าน บางคนยังติดอยู่ชั้นบน สำลักควันกัน ขอความช่วยเหลืออยู่ ขอให้ปลอดภัยทุกๆคน #กัมพูชา#โหนกระแส pic.twitter.com/Cg76a96Zo1
— ตะละแม่บุษบง (@MY_1428_V2) December 28, 2022
ही आग हॉटेलच्या पहिल्या मजल्याला लागली. तिथून ही आग सुरू झाली आणि वेगाने हॉटेलच्या शेवटच्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे हॉटेलचं मोठं नुकसान झालं आहे, अशी माहिती थाई रेस्क्यू ग्रुप रुआमकटान्यू फाऊंडेशनच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.
आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर हॉटेलातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी अनेकांनी पळापळ सुरू केली. मात्र, आगीमुळे बाहेर पडणं अवघड झाल्याने अनेकांनी खिडकीतून उतरण्याचा प्रयत्न केला.
काहींनी तर खिडकीतून उड्या मारल्या. विशेष म्हणजे जीव वाचवण्यासाठी काही पर्यटकांनी थेट पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचं सांगण्यात आलं. व्हायरल व्हिडीओमध्येही तसंच दिसत आहे.
आगीमुळे हॉटेलचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. हॉटेलची संपूर्ण इमारत आगीमुळे काळवंडून गेली आहे. तर आग इतकी भयानक होती की आगीमुळे इमारतीचा काही भाग झुकला आहे, असं सूत्रांनी सांगितलं.