Chagos Islands : इंग्रजांच्या तावडीतून एका बेटाला मिळणार स्वातंत्र्य, भारत या डीलमुळे खूप खुश, कारण…

Chagos Islands : इंग्रजांनी जगावर राज्य केलं असं म्हटलं जातं. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले. पण जगात अजूनही अशी काही बेटं आहेत, जिथे इंग्रजांच राज्य आहे. अशाच एका बेटाला आता इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळणार आहे. यामध्ये भारताचा फायदा आहे.

Chagos Islands : इंग्रजांच्या तावडीतून एका बेटाला मिळणार स्वातंत्र्य, भारत या डीलमुळे खूप खुश, कारण...
chagos islandsImage Credit source: Getty Images
Follow us
| Updated on: Oct 05, 2024 | 4:08 PM

इंग्रजांनी जगातील अनेक देशांवर राज्य केलं. वेळेनुसार, दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांच्या राजवटीतून अनेक देश मुक्त झाले, स्वतंत्र झाले. पण जगात अजूनही काही अशी बेटं आहेत, ज्यावर इंग्रजांच राज्य आहे. अशाच एका बेटाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळणार आहे. जवळपास 50 वर्षानंतर ब्रिटन चागोस द्वीप समूह परत करणार आहे. दोन वर्षात 13 फेऱ्यांची बोलणी झाल्यानंतर चागोस द्वीप समूहाबद्दल हा महत्त्वाचा निर्णय झाला आहे. ब्रिटन आणि मॉरिशेसमध्ये या बेटावरुन अनेक दशकांपासून वाद सुरु होता. चागोस हा हिंद महासागर क्षेत्रातील 58 पेक्षा अधिक बेटांचा एक समूह आहे. या बेटाची मालकी आता मॉरिशसकडे येणार आहे.

दोन्ही देशांमध्ये जो करार झालाय, त्यानुसार डिएगो गार्सिया या एकाबेटावर ब्रिटन-अमेरिकेचा संयुक्त सैन्य तळ कायम राहणार आहे. दोन्ही देशांसाठी रणनितीक दृष्टीने हे महत्त्वाच क्षेत्र आहे. “हिंद महासागरात या रणनितीक क्षेत्राच भविष्य सुरक्षित करण्यासह मॉरिशेससोबतचे संबंध अधिक भक्कम केले आहेत” असं ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी म्हणाले. या करारातंर्गत डिएगो गार्सिया बेटावर ब्रिटनचा ताबा कायम राहिलं. तिथे ब्रिटन आणि अमेरिकेचा संयुक्त सैन्य तळ आहे.

ब्रिटनने या देशाला स्वातंत्र्य कधी दिलं?

या करारासाठी ब्रिटनला अमेरिकेकडून सुद्धा मंजुरी मिळाली आहे. 1965 साली ब्रिटनने ब्रिटिश हिंद महासागर क्षेत्रासाठी BIOT स्थापना केली. चागोस द्वीप समूह मॉरिशेसचा भाग होता. ब्रिटनने एक कॉलनी वसवण्यासाठी हा भाग वेगळा केलेला. 1968 साली ब्रिटनने मॉरिशेसला स्वतंत्रता बहाल केली. पण चागोस द्वीप समूहावरील आपलं नियंत्रण कायम ठेवलं. आता 50 वर्षानंतर या बेटाला स्वातंत्र्य मिळणार आहे.

भारताचा फायदा काय?

चागोस द्वीप समूहाबद्दल झालेल्या निर्णयाच भारत सरकारने स्वागत केलं आहे. भारताने नेहमीच या मुद्यावर मॉरिशेसच समर्थन केलय. 2019 साली UNGA मध्ये चागोस द्वीप समूहाबद्दल मॉरिशेसच्या बाजूने मतदान केलेलं. हिंद महासागर क्षेत्रात चीनची वाढती आक्रमकता पाहता भारताने मॉरिशेससोबत आपले संबंध भक्कम केले आहेत. मॉरिशेसला या बेटाची मालकी मिळाल्यामुळे भारताची क्षेत्रीय सुरक्षा अधिक मजबूत होईल.

चागोस द्वीपसमूह प्रदेशात काय?

हिंद महासागरात मालदीवच्या दक्षिणेपासून 500 किलोमीटर अंतरावर चागोस आहे. चागोस द्वीपसमूहात 58 बेटं आहेत. 18 व्या शतकापर्यंत चागोस द्वीपसमूह रिकामा होता. इथे अजिबात लोकसंख्या नव्हती. फ्रान्स, आफ्रिका आणि भारतातून मजुरांना येथे गुलाम बनवून आणलं. नारळांच्या बागेत काम करायला लावलं. 1814 साली फ्रान्सने हा भाग ब्रिटनकडे सोपवला.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.