मुंबई: यूक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले आहे की, मी आणि माझे कुटुंब रशियाच्या हिट स्क्वाडच्या यादीत आहे. त्यामध्ये माझं पहिलं नाव आहे तर दुसरं नाव माझे कुटुंबीय आहे. रशियातील भीतीदायक असणारे दाढीवाल्यांचे चेचन विशेष बल (Chechen special forces) ज्यांना शिकारीच्या रुपात बघितले जाते, आता त्यांनाच रशियाने युद्धात उतरवले आहे. युक्रेनमध्ये घुसलेल्या पहिल्या फळीतील सैनिक म्हणजेच ज्यांना शिकारी म्हणून ओळखले जाते त्यांचे काम आहे युक्रेनमधील (Ukraine) ज्या अधिकाऱ्यांची नावं रशियाने दिली आहेत, त्यांना पकडून लपवून ठेवणे. चेचन स्पेशल फोर्सचे काही फोटो माध्यमांतून प्रसिद्ध झाले आहेत, ज्यामध्ये ते युक्रेनच्या जंगलातून जात आहेत. रशियाच्या या भयंकर ‘शिकारी’ सैनिकांना युक्रेनियन अधिकाऱ्यांना नजरेसमोर लपवण्याचे आदेश दिले आहेत.
युक्रेनच्या अग्रभागी तैनात असलेल्या सैनिकांच्या म्हणण्यानुसार, या ‘शिकारी’ सैन्याचे काम युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांना पकडून लपवणे आहे. चेचन स्पेशल फोर्सच्या प्रतिमा देखील समोर आल्या आहेत, ज्यामध्ये ते युक्रेनच्या जंगलातून जाताना दिसतात. चेचन विशेष बल फेडरल गार्ड सेवेच्या दक्षिण बटालियनचे असल्याचे समजले जात आहेत. या जवानांचे नमाज पठाण करतानाचे जंगलातील फोटो सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत.
या प्रत्येक सैनिकाकडे शस्त्रांचा मोठा साठा असून त्यांचे युक्रेनमधील काय काय लक्ष्य आहे त्याची माहितीही माध्यमांकडे उपलब्ध झाली आहे. या चेचेन विशेष बलातील सैनिकांना एक विशेष कार्ड दिले आहे. आणि त्या त्या प्रत्येक कार्डमध्ये युक्रेनमधील सगळा तपशील दिला आहे. त्या कार्डमधील तपशील म्हणजेच युक्रेनमधील काही अधिकाऱ्यांच्या नावाची यादी रशियाने दिली आहे, तिच माहिती या कार्डमध्ये आहे. सैनिकांच्या या कार्डमध्ये अधिकारी आणि संरक्षण दलातील अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. रशियाने त्यांच्याकडे तपास यंत्रणेतील संशयित गुन्हेगार म्हणून बघितले आहेत.
चेचेन स्पेशल फोर्सला दिलेल्या यादीत ज्यांची नावं आहेत त्यांच्याविषयी भयंकर अशी माहिती देऊन त्यांना सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांना तुम्ही अटक करण्यास जाणार आहात ती लोकं तुम्हाला त्रास देत असतील तर त्यांना सरळ मृत्यूदंडाची शिक्षा द्या असं स्पष्टपणे त्यांना सांगितले आहे. या माहितीवरुन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांना समजून आले आहे की, त्यांच्या हिटलिस्टवर सगळ्यात आधी आपला नंबर आहे तर दोन नंबरला माझं कुटूंब आहे. पुतिन यांचा हा आदेश आहे आमि त्यामागे मोठे षढयंत्रही आहे. युक्रेनमधील झेलेन्स्कींचे सरकार बरखास्त करुन त्यांची सत्ता संपुष्टात आणायची आहे. त्यामुळे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षलाही एक गुप्त ठेऊन तिथून ते संबोधित करत आहेत.
संबंधित बातम्या
युक्रेनमधील 250 विद्यार्थी रोमानियात दाखल, कुणी व्यवस्था केली? वाचा सविस्तर
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी हलचाली वाढल्या, कसा संपर्क साधाल?