संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या चीनला अंतराळ मोहिमेत मोठं यश, मंगळावर अवकाशयान उतरवलं

चीननं (China) मंगळ (Mars) ग्रहावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले आहे. China Mars Tianwen

संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या चीनला अंतराळ मोहिमेत मोठं यश, मंगळावर अवकाशयान उतरवलं
Tianwen
Follow us
| Updated on: May 15, 2021 | 11:43 AM

बीजिंग: चीनला अंतराळ मोहिमेत मोठं यश मिळालं आहे. चीननं (China) मंगळ (Mars) ग्रहावर यशस्वीरित्या अवकाशयान उतरवले आहे. चीनच्या या अवकाशयानाचं नाव ताईन्वेन-1 (Tianwen) असं आहे. मंगळ ग्रहावर अवकाशयान उतरवणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे. (China completes historic Mars spacecraft landing Tianwen-1)

चीनला मंगळ मोहिमेत यश

चीननं मंगळावर पाठवलेलं अवकाशयानं हे मानवविरहीत आहे. ताईन्वेन हे अवकाशयान चीनच्या अंतराळ संशोधन केंद्रातून पाठवण्यात आले. चीनमधील वृत्तसंस्था शिनुआनं याबाबत वृत्त दिलं आहे. चीनचं हे मंगळावरील पहिलं पाऊल आहे. ताईन्वेन-1 हे अवकाशयान मंगळावर उतरलेल्या ठिकाणाला युटोपिया प्लॅन्शिया म्हटलं जातं.

झुरोंग रोव्हर मंगळावरील माती आणि वातावरणाचा अभ्यास करणार

ताईन्वेन-1 अवकाशयानातून सौर ऊर्जेवर चालणारा रोव्हर झुरोंग (Zhurong)पाठवण्यात आला आहे. झुरोंग हा रोव्हर मंगळावर उतरलेल्या ठिकाणाचं सर्वेक्षण करेल आणि माहिती चीनच्या अवकाश संशोधन केंद्राकडे पाठवेल. झुरोंग रोव्हरवर टोपोग्राफी कॅमेरादेखील बसवण्यात आलेला आहे. रोव्हर मंगळ ग्रहावरील माती आणि वातावरणाचा अभ्यास करेल. याशिवाय मंगळग्रहावरील प्राचीन जीवन, पाणी आणि बर्फ याबाबतही अभ्यास केला जाणार आहे.

चीननं पाठवलेल्या अवकाशयानाला एका कवितेवरुन नाव देण्यात आलं आहे. ताईन्वेन हे पाच टन वजन असलेलं अवकाशयानं चिनी बेट हैनान (Hainan)येथून गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रक्षेपित करण्यात आलं होतं. सहा महिन्यांच्या कालावधीनंतर फेब्रुवारीमध्ये अवकाशयानानं मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला होता. झुरोगं रोव्हर यशस्वीरित्या कार्यरत झाल्यास चीन हा पहिल्याचं मोहिमेत यशस्वी ठरणारा देश ठरेल.

संबंधित बातम्या:

चीनचं ‘ते’ अनियंत्रित रॉकेट नेमकं कधी पृथ्वीवर पडू शकतं? जीवसृष्टीला धोका काय?

चीनच्या कारनाम्याने जग पुन्हा टेन्शनमध्ये, रॉकेटवरील नियंत्रण सुटलं, कधीही-कुठेही कोसळण्याचा धोका

(China completes historic Mars spacecraft landing Tianwen-1)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.