China-Pakistan Deal : जे फायटर विमान फक्त अमेरिका-चीनकडे, ते आता पाकिस्तानला मिळणार, भारतासाठी अलर्ट होण्याची वेळ

China-Pakistan Deal : पाकिस्तानला लवकरच एक घातक फायटर विमान मिळू शकतं. भारतासाठी ही अलर्ट होण्याची वेळ आहे. हे फायटर जेट किती पावरफुल आहे, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण हे विमान हाती लागल्यास पाकिस्तानी एअर फोर्सची क्षमता कैकपटीने वाढेल.

China-Pakistan Deal : जे फायटर विमान फक्त अमेरिका-चीनकडे, ते आता पाकिस्तानला मिळणार, भारतासाठी अलर्ट होण्याची वेळ
China J-35 AImage Credit source: PLA
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 12:49 PM

चीन पाकिस्तानला 40 हायटेक फायटर जेट देऊ शकतो. बीजिंग आणि इस्लामाबादमध्ये या बद्दल चर्चा सुरु आहे. ही डील फायनल झाली, तर पाकिस्ताकडे चिनी बनावटीच्या J-35A मल्टी-रोल फायटर जेटच स्क्वाड्रन असेल. J-35A ताफ्यात असलेला पाकिस्तान जगातील पहिला आणि एकमेव देश असेल. J-35A स्टेल्थ फायटर जेट आहे. अमेरिकेनंतर चीनकडेच पाचव्या पिढीची स्टेलथ फायटर विमानं आहेत. पाकिस्तानकडे अमेरिकेने दिलेली F-16 आणि फ्रान्सची मिराज फायटर विमानं आहेत. पाकिस्तान आता ही विमानं बदलण्याचा विचार करत आहे. हाँगकाँग स्थित चायना मॉर्निंग पोस्टच्या एका रिपोर्ट्नुसार चीन दोन वर्षांपेक्षा पण कमी वेळात पाकिस्तानला 40 फायटर जेट देणार आहे.

रिपोर्ट्नुसार पाकिस्तानी एअर फोर्सने आधीच ही विमान विकत घ्यायला मंजुरी दिली आहे. बीजिंग अजून पृष्टी केलेली नाही. शेनयांग J-35A स्टेल्थ दोन इंजिनच फायटर जेट आहे. हे सिंगल सीटर विमान आहे. जमीन आणि समुद्र दोन्ही ठिकाणी कारवाई करण्यासाठी हे फायटर जेट सक्षम आहे. J-35A ला J-20 नंतर विकसित करण्यात आलं आहे. हे पाचव्या पिढीच स्टेलथ फायटर विमान आहे. J-35A ची डिझाइन यूएस लॉकहीड मार्टिनच्या F-35 सारखी आहे.

चीन फायटर जेट्सची नक्कल करण्यात माहीर

फरक इतकाच आहे की, पहिलं ट्विन इंजिन आहे आणि दुसरं सिंगल इंजिन. चीनला अमेरिकी विमानांच्या डिझाइनची नक्कल करण्यासाठी ओळखलं जातं. J-20 आणि US F-22 रॅप्टरच्या डिझाइनमध्येही भरपूर समानता आहे. चेंगदू जे-10 हे यूएसच्या एफ-16 ची कॉपी वाटते.

या फायटर विमानाच वैशिष्ट्य काय?

चिनी कम्युनिस्ट पार्टीच मुखपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका रिपोर्ट्नुसार J-35A स्टेल्थ आणि काऊंटर-स्टेल्थ दोन्ही युद्ध लढण्यास सक्षम आहे. J-35A स्टेल्थ फायटर जेटची सर्वात पहिली झलक नोव्हेंबर महिन्यात झुहाई शहरात वार्षिक एअर शो मध्ये दाखवण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सचे अधिकारी तिथे उपस्थित होते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्ट्नुसार पाकिस्तानी एअर फोर्सचे प्रमुख एअर मार्शल जहीर अहमद बाबर सिद्धू यांनी सांगितलं की, जे-31 स्टेल्थ फायटर जेट मिळवण्याचा पाया आधीच रचला आहे. J-31 हे J-35A च लँड वर्जन आहे. चिनी सैन्यानुसार J-35A ला एअर कॉम्बॅट ऑपरेशनसाठी डिझाइन केलय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.