आमच्या जागेत आम्ही काहीही करु; अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्यानंतर चीनने दंड थोपटले

चीनच्या कुरघोड्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. भारताकडून कडक इशारे देऊनही त्याची भारतीय हद्दीत घुसखोरी सुरूच आहे.

आमच्या जागेत आम्ही काहीही करु; अरुणाचल प्रदेशात गाव वसवल्यानंतर चीनने दंड थोपटले
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 4:52 PM

बीजिंग : चीनच्या कुरघोड्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. भारताकडून कडक इशारे देऊनही त्याची भारतीय हद्दीत घुसखोरी सुरूच आहे. भारताची इंच इंच जागा बळकावण्यासाठी चीननं चांगलीच कंबर कसली आहे. चीनने भारतातल्या अरुणाचल प्रदेशमध्ये एक गाव वसवलं आहे. एका अहवालानुसार, चीननं भारताच्या अरुणाचल प्रदेशमधील एका भागात सुमारे 101 घरे बांधली आहेत. चीनने वसवलेलं गाव अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) वास्तविक भारतीय सीमेपासून सुमारे साडेचार किमी अंतरावर आहे. ही बातमी वाचनात आल्यापासून भारतीय लोक प्रचंड रोष व्यक्त करत आहेत. तसेच भारतीयांनी आता ‘ड्रॅगन’च्या विरोधात आघाडीच उघडलीय. दरम्यान या गावाबाबत बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, गावाच्या उभारणीचं एक अत्यंत सामान्य काम सुरु आहे, कारण ते आमच्या जागेत होतंय. (China defends new Village in Arunachal Pradesh says construction on its own Territory is normal)

ज्या जागेवर गाव वसवलं आहे ती जमीन आमची आहे, असा दावा करत ड्रगनने दंड थोपटले आहेत. दरम्यान, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, चीन आणि भारताच्या सीमेलगत पूर्व भागाबाबत किंवा जँगनानबाबत (दक्षिणी तिब्बत) चीनची स्थिती स्पष्ट आहे. आम्ही कधीही चीनी क्षेत्रात अवैधपणे बनवलेल्या कथित अरुणालच प्रदेशला मान्यता दिलेली नाही. आम्ही आमच्या क्षेत्रात जी काही विकासकामं सुरु केली आहेत, ती आमची अंतर्गत बाब आहे. आम्ही आमच्या जमीनीवर कोणतीही विकासकामं केली किंवा संबंधित कामं सुरु केली तर ती आमच्यासाठी आणि सर्वांसाठीच खूपच सामान्य बाब आहे.

भारतीय मीडिया रिपोर्ट्समुळे परिस्थिती चिघळणार?

चीनच्या सरकारी माध्यमांनीही याबाबत अनेक लेख प्रसिद्ध केले आहेत. चीनच्या अधिकृत सरकारी माध्यमांनी सांगितले की, चीनने उभारलेल्या गावाबाबतच्या बातम्या भारतात अतिशयोक्तीपूर्णपणे (मीठ-मसाला लावून) मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्लोबल टाईम्सशी बोलताना चिनी तज्ज्ञ झांग योंगपन म्हणाले की, भारतीय मीडिया रिपोर्ट्स भारत-चीन सीमेवरील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करत आहेत. यामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते.

चीनने अरुणाचल प्रदेशात एक गाव वसवले

एका मीडिया हाऊसच्या म्हणण्यानुसार, चीनने अरुणाचल प्रदेशात एक गाव वसवले असल्याचे उपग्रह छायाचित्रात दिसून येतंय. अनेक तज्ज्ञांनीही याची खातरजमा केली आगे. 1 नोव्हेंबर 2020 चे रोजी हे छायाचित्र टिपण्यात आले आहे. असे म्हणतात की, हे गाव तसरी नदीकाठी वसलेले आहे. ज्या ठिकाणी हे गाव आहे, त्या भागावरून भारत आणि चीनमध्ये बराच काळ वाद सुरू आहे.

भारतीय नेटकऱ्यांची चीनला नुडल्स बॅनची धमकी

या संपूर्ण भागाबद्दल लोक पुन्हा एकदा चीनविरोधात रोष व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर काही लोक या प्रकरणावर सरकारकडे जाबही मागत आहेत. अनेक भारतीय नेटकऱ्यांनी चीनला नुडल्स बॅनची धमकीसुद्धा दिली आहे. सॅटेलाट फोटोत दिसत असलेल्या बांधकामानुसार चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या हद्दीत घुसखोरी करून एक नवा गाव वसवल्याची माहिती मिळालीय.तसेच हे गाव भारताच्या प्रत्यक्ष सीमेपासून साडे चार किलोमीटर आत वसले असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब भारताची चिंता वाढवणारी आहे.

संबंधित बातम्या

अरुणाचल प्रदेशात चीननं वसवलं गाव; भारतीय म्हणतात…

पुणे जिल्ह्यातील संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण

(China defends new Village in Arunachal Pradesh says construction on its own Territory is normal)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....