चीनमध्ये जगातलं सर्वात मोठं सीसीटीव्हींचं जाळं, विस्तारवादी चिनी सरकारची जनतेच्या खासगी आयुष्यातही घुसखोरी
चीन स्वतःच्या जनतेच्या खासगी आयुष्यातही अहोरात्र घुसखोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे (China government interfere in people life).
बीजिंग : इतर देशांच्या हद्दींवर घुसखोरी करणारा चीन स्वतःच्या जनतेच्या खासगी आयुष्यातही अहोरात्र घुसखोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे (China government interfere in people life). चीनमधल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीचं आयुष्य हे एखाद्या खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. चीन सरकारला वाट्टेल तेव्हा ते त्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यात डोकावून त्यांची अख्खी कुंडली काढू शकतात (China government interfere in people life).
एका माहितीनुसार, फक्त चीनमध्येच 35 कोटींच्या आसपास सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, म्हणजे अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही 3 कोटी जास्त. समजा, हे कॅमेरे जर अमेरिकेत असते, तर अमेरिकेतल्या प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र एक सीसीटीव्ही कॅमेरा असता. चीनमध्ये जगातलं सर्वात मोठं सीसीटीव्हींचं जाळं आहे.
चीनच्या सरकारनं आपलं सर्व सीसीटीव्हीचं नेटवर्क आर्टिफिशयल फेस इंटेलिजन्स सिस्टिमशी जोडलं आहे. चीनमधील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बनावट ही A-आय पॉवरनं विकसित झाली आहे. इथले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त चेहरेच टिपत नाहीत, तर त्यांची सर्व माहितीसुद्धा एका झटक्यात देऊन मोकळे होतात.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
चीन सरकारनं खूप आधीपासूनच आपल्या प्रत्येक नागरिकाला एक डिजिटल आयडेंटिटी दिली आहे. ती सर्व माहिती सीसीटीव्ही नेटवर्क आणि आर्टिफिशयल नेटवर्कला जोडण्यात आली आहे. गर्दीत जर एखाद्या बाहेर देशातला व्यक्ती असेल, तर चीनची सीसीटीव्ही यंत्रणा या अनोळख्या व्यक्तीला एका मिनिटात रेड सिग्नलनं इंडिकेट करते. त्यानंतर त्या शहरातल्या कंट्रोल रुममधून त्या व्यक्तीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली जाते.
हेही वाचा : चीनचे सर्व फासे उलटे पडणार, भारतीय वायुदलात आकाशातला सर्वात मोठा योद्धा दाखल होणार
चीन सरकार गुन्हे रोखणं आणि चोरांना शोधण्यासाठी ही यंत्रणा उभी केल्याचं सांगत आलं आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यामागचा हेतू हा लोकांची हेरगिरी करण्याचाच आहे. कोरोना प्रसाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात याच यंत्रणेचा चीनला फायदा झाला. आर्टिफिशयल इंटेलिजन्स सिस्टिममध्ये फक्त चेहरेच नाहीत, तर त्या व्यक्तीनं मागच्या काही दिवसात केलेला प्रवास, त्या व्यक्तीनं केलेले व्यवहार, फोनवरुन केलेलं संभाषण या सर्वांची माहिती जमा केली जाते.
जगभरात जे भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होतात, ते बहुतांश चीनमधलेच असतात. त्यामागचं कारणसुद्धा प्रत्येक चौका-चौकात चीननं विणलेलं हे सीसीटीव्हींचं जाळ आहे. या सीसीटीव्ही जाळ्याच्या माध्यमातून चीन जनतेच्या सुरक्षेचा ठेंबा मिरवतो. मात्र जनतेच्या सुरक्षेचा हा देखावा वास्तवात स्वतःच्या सुरक्षेचा आहे. कारण, आपल्या हुकुमशाहीविरोधात जनतेत बंडाचे धुमारे फुटणार नाहीत, या चिंतेपोटी चीनला अहोरात्र जागं राहून हेरगिरी करावी लागते.
हेही वाचा : चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ