China Virus Passport : कोरोनाला थोपवण्यासाठी चीनमध्ये ‘व्हायरस पासपोर्ट’चं लाँचिंग, जाणून घ्या नेमकी भागनड काय?

आंतराराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या तसेच चीन देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी व्हायरस पासपोर्ट ( virus passport) नावाची संकल्पनी आणली आहे. (china virus passport corona test vaccination)

China Virus Passport : कोरोनाला थोपवण्यासाठी चीनमध्ये 'व्हायरस पासपोर्ट'चं लाँचिंग, जाणून घ्या नेमकी भागनड काय?
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 11:52 PM

बिजिंग :  कोरोनाचा सर्वात पहिला रुग्ण चीनमध्ये आढळला.त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोनाचा फैलाव झाला. या कोरोना महामारीमध्ये आतापर्यंत लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. ज्या चीनमध्ये कोरोना संसर्गाचा उगम झाला असं म्हटलं जातं, आता त्याच देशाने आंतराराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या तसेच देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी व्हायरस पासपोर्ट ( virus passport) नावाची संकल्पनी आणली आहे. चीनने व्हायरस पासपोर्टचं लाँचिंग केलं आहे. (china has launched the virus passport which gives information of corona test and vaccination)

व्हायरस पासपोर्ट देणारा चीन जगातील पहिलाच देश?

चीनने कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी व्हायरस पासपोर्ट नावाचे डिजीटल हेल्थ सर्टीफिकेट तेथील नागरिकांना देणे सरु केले आहे. ज्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास करायचा असेल त्यांना हे दिले जाईल. अशा प्रकारचा पासपोर्ट देणारा चीन हा जगातील पहिलाच देश आहे.

व्हायरस पासपोर्ट काय आहे?

हे एका हेल्थ सर्टिफिकेटप्रमाणे काम करेल. विदेशात जाणाऱ्या प्रवाशांना हा पासपोर्ट दिला जाईल. हे एक डिजीटल सर्टिफिकेट असून त्यामध्ये व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे की नाही?, त्याने कारोनाची टेस्ट केलेली आहे की नाही?, केलेली असेल तर त्या चाचणीचा रिझल्ट काय आहे?, या सर्व बाबींची माहिती असेल. हे सर्टिफीकेट चायनीज सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वी चॅटवर (WeChat) उपलब्ध असेल. व्हायरस पासपोर्टचे लाँचिंग 8 मार्च रोजी झाले होते.

याविषयी अधिक माहिती देताना जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासाला चालना मिळावी म्हणून आम्ही हे सर्टिफिकेट लॉन्च केले आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रतिनिधीने सांगितले. चीन सरकारने लॉन्च केलेले हे हेल्थ सर्टिफिकेट सध्या फक्त चीनच्या नागरिकांसाठी आहे. तसेच ते बंधनकारक नसून ऐच्छिक आहे.

दरम्यान बहरीन या देशाने याआधीच व्हॅक्सीन पासपोर्ट नावाची संकल्पना राबवली आहे. तसेच अमेरिका आणि युकेमध्येसुद्धा अशाच प्रकारची संकल्पना राबवण्यावर विचार सुरु आहे.

इतर बातम्या :

अबब! तब्बल 10 कोटी 26 लाखाला विकली गेली ‘पवित्र’ व्हिस्की, काय आहे खास?

Video : ‘मला गोळी मारा, पण लोकांना जाऊ द्या’, म्यानमारमध्ये एका ननची लष्करी जवानांना विनंती

मलाला यूसुफझई बनली Apple ची पार्टनर! कार्टून फिल्म आणि डॉक्यूमेंट्री बनवणार

(china has launched the virus passport which gives information of corona test and vaccination)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.