चीनने बनवले अदृश्य फायटर जेट J-35A, पाकलाही मिळणार, भारताची काय स्थिती?
भारताचा नंबर एकचा शत्रू चीनने अमेरिकेच्या एफ-35 च्या तोडीस तोड नवीन जेट फायटर जे-35 ए तयार केले असून ते तो पाकिस्तानाला ही देणार आहे.त्यामुळे भारताचे टेन्शन वाढले आहे.
अमेरिका आणि भारतात तणाव सुरु असतानाच चीनच्या वायू सेनेने अमेरिकेच्या एफ-35 ला टक्कर देणारे फाइटर जेट J-35A झुहाई एअर शोमध्ये सादर केले आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने हे स्टील्थ तंत्राचे फायटर जेट असल्याने रडारवर दिसणार नाही. त्यामुळे चीनचे हे विमान एकप्रकारे अदृश्य असून शत्रूच्या मुलखात सहज घुसून हल्ला करु शकणार आहे. चीनी वायूसेनेचे कर्नल नियू वेंबू यांनी सांगितले की हे जे-35 ए एक मध्यम आकाराचे स्टील्थ लडाऊ विमान असून एकाच वेळी अनेक कारवायांसाठ ते वापरता येणार आहे. चीनच्या या फायटर जेट पाकिस्तानच्या सैन्याने देखील खरेदी केलेले आहे.लवकरच त्याचा पुरवठा सुरु होणार आहे. पाकिस्तानचे पायलट या विमानाचे सध्या प्रशिक्षण घेत आहे.
एकीकडे चीन आणि पाकिस्तानच्या वायू सेनेत स्टील्थ फायटर जेट सामील होत आहेत तर भारतीय वायू सेना आपल्या स्वदेशी चौथ्या पिढीच्या फायटर जेट तेजसच्या नव्या आवृत्तीकडे डोळे लावून बसलेली आहे. अमेरिकेची कंपनी जीईने तेजस फायटरच्या नव्या आवृत्तीला इंजिन देण्यास नकार दिलेला आहे. त्यांनी साल 2025 मध्ये पुरवठा करु असे म्हटले आहे.एकीकडे भारतीय वायू सेना तेजसची वाट पहात असताना तिकडे आपला सर्वात मोठा शत्रू चीन एकापाठोपाठ एक नवीन फायटर जेट ताफ्यात सामील करीत आहे. आणि शिवाय पाकिस्तानला देखील देत आहे. त्यातच तेजस स्टील्थ टेक्नॉलॉजीचे नसल्याने भारताला मोठा धोका वाढला आहे.
अमेरिकेच्या एफ-35 ला चीनचे उत्तर
चीनमध्ये 12 ते 17 नोव्हेंबर दरम्यान झुहाई एअर शो हणार आहे यात सहभागी होण्यासाठी रशियाचे सुखोई-57 फायटर जेट देखील आले आहे. चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांनी या नवीन जेट फायटरचे छायाचित्र सादर केले असून अधिक माहीती देण्यास नकार दिलेला आहे. हे सैन्यात सहभागी केले आहे की नाही हे देखील चीनने सांगितलेले नाही.अमेरिकेनंतर आता चीन आता दुसरा देश बनला आहे ज्यांच्याकडे दोन प्रकारचे स्टील्थ फायटर जेट आहेत. चीनकडे आधीपासूनच जे-20 स्टील्थ फायटर जेट आहे. आता नव्या फायटर जेटची चर्चा चीन सोशल मिडीयावर सुरु आहे. चीनचे जे-35 अमेरिकेच्या एफ-35 फायटर व्हर्टीकल, टेकऑफ आणि लॅंडिंगच्या क्षमतेने सुसज्ज नसल्याचे म्हटले जाते.
भारत स्वदेशी तेजस फायटर जेटची वाट पहातोय
पाकिस्तान आणि चीनच्या वायू सेनेत नव्या जेट फायटरचा समावेश होणे भारतासाठी धोक्याची घंटा आहे. कारण भारताकडे पाचव्या पिढीतील एकही जेट फायटरनाही. भारताला रशियाने सुखोई 75 फायटर जेट आणि सुखोई – 57 फायटर जेटची ऑफर दिलेली आहे.तर अमेरिका देखील भारताला एफ-35 विकू इच्छीत आहे. भारताने या संदर्भात अजून निर्णय घेतलेला नाही. तर दुसरीकडे फ्रान्सने देखील भारताला सुपर राफेलची ऑफर दिलेली असून ते खूपच शक्तीशाली आहे.