China Plane Crash : विमान दुर्घटनेआधी नेमकं काय घडलं? जाणून घ्या 10 मोठ्या घडामोडी
China Plane Crash : कॅश झालेलं विमान हे चायना ईन्टर्न एअरलाईन्सचं होतं. 737-800 विमान दक्षिण चीनच्या पर्वरांगांमधून झेपावत अचानक दुर्घटनाग्रस्त झालं.
चीनमध्ये विमान दुर्घटनेनं (China Plane Crash) एकच हाहाकार उडवलाय. गुआंगशी (Guangxi province) छुआंग स्वायत्त क्षेत्रात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या विमानात एकूण 132 लोक होते. यापैकी 123 प्रवासी आणि नऊ क्रू मेंमबर (Passengers & Crew Members) विमानात होते. कॅश झालेलं विमान हे चायना ईन्टर्न एअरलाईन्सचं होतं. 737-800 विमान दक्षिण चीनच्या पर्वरांगांमधून झेपावत अचानक दुर्घटनाग्रस्त झालं. यानंतर विमानाला मोठी आग लागली. दुर्घटनाग्रस्त विमान कुनमिंगहून ग्वांगधू इथं जात होतं. 1340 किलोमीटर अंतर कापण्यासाठी झेपावलेलं हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानं एकच खळबळ उडाली. विमान दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र विमानातील एकाही व्यक्तीचा सुगावा लागू शकलेला नाही. दरम्यान, विमान दुर्घटनेंच एक सीसीटीव्ही देखील समोर आलं आहे. इतर तपास यंत्रणा आता विमान नेमकं का दुर्घटनाग्रस्त झालं, याबाबत तपास करत आहेत. मात्र दुर्घटनेआधी नेमकं काय घडलं, ते या दहा बाबींमधून समजून घेऊया…
महत्त्वाच्या 10 गोष्टी :
- भारतीय वेळेनुसार सकाळी 10.41 वाजता कुनमिंगहून झेपावलं
- स्थानिक वेळेनुसार दुपारी 3.05 मिनिटांनी हे विमान लॅन्ड होणार होतं. ग्वांगझू इथं हे विमान लॅन्ड होणार होतं.
- हे विमान वेगानं खालच्या दिशेनं जात असल्याचं दिसून आलं होतं. रडारमध्ये तसे संकेतही मिळाले होते. दरम्यान, वुझोऊ शहराजवळ या विमानाचा संपर्क तुटला.
- वातावरण चांगलं नसल्याकारणानं दृश्यमानतका कमी असेल आणि ढग असतील, असा अंदाज आधीच ऑनलाईन वेदर रिपोर्टमधून देण्यात आला होता. वुझोऊ शहारावरील वातावरणाबाबत दुर्घटनेवेळी खराब हवमानाची शक्यता वर्तवण्यात आली
- भारतीय वेळेनुसार 11 वाजून 50 मिनिटांनी 29 हजार 100 फूट उंचीवरुन हे विमान झेपावत होते.
- जवळपास 135 सेकंदांनंतर विमान 9 हजार 75 फूट उंचीवर आलं असल्याची माहिती FlightRadar24 च्या हवाल्यानं दिली जाते आहे.
- विमानाची शेवटची उंची जेव्हा मोजण्यात आली, तेव्हा हे विमान 3225 फूट इतक्या उंचीवर होतं. दुर्घटनेच्या 20 सेकंद आधी ही नोंद करण्यात आली होती.
- भारतीय वेळेनुसार 2 वाजून 22 मिनिटांनी विमान ट्रॅक होणं बंद झालं होतं.
- त्यानंतर विमान दुर्घटनेचं वृत्त समोर आलं होतं. याबाबत घटनास्थळाचे व्हिडीओही समोर आलेत.
- सीवील एविएशन एडमिन्ट्रेशन ऑफ चायनाकडून तातडीनं दुर्घटनास्थळावरुन बचावकार्यही जारी करण्यात आलं.
पाहा विमान दुर्घटनेचं सीसीटीव्ही :
China मध्ये plane क्रॅश झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद | China Plane Crash#China #Plane #CCTV #PlaneCrash
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRyeJh9 pic.twitter.com/bXPKhFT44H
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 21, 2022
इतर बातम्या :
चीन, यूरोपनंतर आता भारतातही धोक्याची घंटा? देशभरात एकाच दिवसात दीड हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण
कोण आहेत संदीप पाठक ज्यांना आपचे ‘अमित शाह’ म्हटलं जातं, ज्यांना केजरीवालांनी राज्यसभेवर पाठवलं?
काँग्रेसचं राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात?; काय आहे नेमकं गणित?