क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या महिलेपुढे चिनी सरकार हादरलं, काई शिया यांनी जिनपिंग विरोधात बंड पुकारलं

काई शिया या त्याच महिला आहेत ज्यांनी जिनपिंग यांच्या अमर्याद सत्तेला आव्हान दिलं आहे.

क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या महिलेपुढे चिनी सरकार हादरलं, काई शिया यांनी जिनपिंग विरोधात बंड पुकारलं
Follow us
| Updated on: Aug 21, 2020 | 12:06 AM

बिजिंग : ”हम करे सो कायदा” म्हणणाऱ्या जिनपिंग यांच्या देशात क्रांतीची ठिणगी (China Cai Xia Vs Xi Jinping) पडत आहे. जिनपिंग यांचा नायकाच्या वेशातला खलनायकाचा चेहरा हळूहळू समोर येऊ लागला आहे. कारण, क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या एका महिलेपुढे चिनी सरकार हादरलं आहे. त्याच महिलेच्या नेतृत्वात चीन नव्या बदलाचे स्वप्न पाहतो आहे (China Cai Xia Vs Xi Jinping).

काई शिया या त्याच महिला आहेत ज्यांनी जिनपिंग यांच्या अमर्याद सत्तेला आव्हान दिलं आहे. कधी काळी काई शिया या जिनपिंग यांच्या मर्जीतल्या होत्या. जिनपिंग यांचा आदेश काई शिया यांच्यासाठी सुद्धा शिरसावंद्य होता. चीन सरकारच्या अनेक पापांच्या काई शिया या स्वतः साक्षीदार राहिल्या आहेत. मात्र आता पाणी डोक्यापार गेल्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे.

काई शिया व्यवसायाने प्राध्यापक आहेत. अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी चीनमध्ये एक स्वतंत्र पक्षाचं सेंटर आहे. त्याच सेंटरमध्ये काई शिया अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देतात. त्याआधी कम्युनिस्ट पक्षात काई शिया मोठ्या नेत्या मानल्या जायच्या.

काई शिया यांनी जून महिन्यात एक मुलाखत दिली होती. मात्र, जिनपिंग सरकारने तो प्रसारित होऊ दिला नाही. मात्र, 17 ऑगस्टला तिच मुलाखत सोशल मीडियात लीक होताच चीनच्या कम्युनिस्ट पार्टीत खळबळ उडाली.  ती मुलाखत म्हणजे जिनपिंग यांच्या जुलमी कारभाराचा अध्यायच आहे (China Cai Xia Vs Xi Jinping).

काई शिया यांनी मुलाखतीत जिनपिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. “जिनपिंग हेच चीनच्या विकासातले खरे अडसर आहेत. जिनपिंग यांच्यामुळे चीन साऱ्या जगाचा शत्रू बनला आहे. फक्त मीच नाही, तर अर्धा कम्युनिस्ट पक्ष फुटण्याच्या मार्गावर आहे. शेकडो लोकांना पक्ष सोडण्याची इच्छा आहे, मात्र जिनपिंग यांनी सदस्यांना धमकावणं सुरु केलं आहे. पक्षातले सर्व निर्णय फक्त जिनपिंगच घेतायत, इतर कुणाचा शब्दही ऐकला जात नाही”, असे आरोप काई शिया यांनी केले आहेत.

चीनमध्ये जिनपिंग यांच्याविरोधात उठणार आवाज दाबला जातो. पत्रकार गायब होतात, सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या होतात आणि बंडखोर नेत्यांना तुरुंगात डांबलं जातं. फेब्रुवारीत सुद्धा असाच एक आवाज उठला. चाईनीज मार्शल आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शि जियोंग यांनी जिनपिंग यांनाच चीनचा गुन्हेगार म्हटलं. मात्र, त्याच्याच दुसऱ्याच दिवशी ते तुरुंगात होते. त्या अटकेविरोधात लोकांचा निदर्शनं सुद्धा केली. मात्र, ते आंदोलन सुद्धा दडपलं गेलं.

काई शिया यांचं बंड कदाचित दाबलं जाईल. मात्र, त्यांच्या एका मुलाखतीने 140 कोटीच्या चीनमध्ये चर्चा सुरु झाली. चिनी जनतेतल्या उद्रेकाला हवा दिली. काही मिनिटांची त्यांची मुलाखत जिनपिंग यांच्या वर्षानुवर्षाच्या पापांचा पाढाच आहे. चीन भलेही सीमेवर युद्धसराव करत असेल, पण त्यांचा स्वतःचा देशच कधीही युद्धभूमीत बदलू शकतो. कारण, जिनपिंग यांच्या जुलमी कारभारानं त्यांच्याच जनतेच्या मनात बंडखोरीचे सुरुंग पेरुन ठेवले आहेत.

China Cai Xia Vs Xi Jinping

संबंधित बातम्या :

माली देशात सैन्याच्या बंडाने तख्तापलट, सैन्याचं बंड, राष्ट्रपतींसह अनेकांना बेड्या, चीनचं कपट

तैवानच्या अवकाशात अमेरिकेचे बॉम्बर युद्ध विमान, अमेरिकेचं चीनला आव्हान, तैवानच्या माध्यमांचा दावा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.