ताशी 600 किमी वेग, विमानापेक्षा सुसाट धावणारी रेल्वे, पुणे- मुंबई गाठणार केवळ काही मिनिटांत
Maglev Train in China: अल्ट्रा हाय-स्पीड ट्रेन बीजिंग ते शांघाय दरम्यान चालवण्याची योजना आहे. या दोन शहरांमधील अंतर अल्ट्रा हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेनमुळे दीड तासांत पूर्ण होणार आहे. या दोन्ही शहरांचे अंतर 1214 किलोमीटर आहे.
देशात बुलेट ट्रेन सुरु होणार आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. ही बुलेट ट्रेन 320 किलोमीटर वेगाने धावणार आहे. परंतु 1000 किलोमीटर वेगाने बुलेट ट्रेन धावल्यास विमानाची गरज पडणार नाही. मुंबई नागपूर हे अंतर ही ट्रेन एका तासापेक्षा कमी वेळेत गाठणार आहे. ही ट्रेन भारतात आली तर पुणे मुंबई अंतर काही मिनिटांत पूर्ण होणार आहे. चीनने नुकतेच हायस्पीड ट्रेनची चाचणी यशस्वी केली आहे. या चाचणीनुसार ही ट्रेन 1000 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणार आहे.
ताशी 1000 किमीचा वेग
चीनने नुकतेच सुपर बुलेट ट्रेनची यशस्वी चाचणी केली आहे. अल्ट्रा हाय स्पीड मैग्लेव ट्रेन तासाला एक हजार किलोमीटर वेगाने धावत आहे. ‘ग्लोबल टाइम्स’ च्या रिपोटनुसार अल्ट्रा हाय-स्पीड ट्रेन लो-व्हॅक्यूम ट्यूब मॅग्लेव्ह ट्रान्सपोर्ट सिस्टम अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. ट्रायल रनमध्ये ही ट्रेन ताशी 1000 किलोमीटर वेगाने धावण्यात यशस्वी ठरली आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या चाचणीमुळे संपूर्ण प्रणालीच्या दक्षतेची माहिती मिळाल्याचे म्हटले आहे. या प्रकल्पाला सक्षम म्हटले गेले आहे.
ट्रॉयल रनमध्ये कसे चालले काम
चीनमधील अल्ट्रा हाय-स्पीड ट्रेनच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रॉयल रन दरम्यान फ्लाइंग ट्रेनचे मॅग्नेटिक सस्पेंशन ट्रॅव्हल आणि ब्रेक चांगले काम करत होते. या प्रकल्पाशी संबंधित सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. चीनमधील दोन मोठ्या शहरांदरम्यान ही हाय-स्पीड फ्लाइंग ट्रेन्स चालवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ कमी होईल.
काय आहे ट्रेनमधील तंत्रज्ञान
अल्ट्रा हाय-स्पीड ट्रेन बीजिंग ते शांघाय दरम्यान चालवण्याची योजना आहे. या दोन शहरांमधील अंतर अल्ट्रा हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेनमुळे दीड तासांत पूर्ण होणार आहे. या दोन्ही शहरांचे अंतर 1214 किलोमीटर आहे. मैग्लेव ट्रेन आपल्या पारंपारीक ट्रेनसारखी नाही. तिला एक्सल किंवा बियरिंग्स नसतात. त्यांची डिझाइन विशेष पद्धतीने तयार केली असते. ही ट्रेन ट्रॅक्सच्या वरती इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाने धावते.